27 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeKhedमंत्री चव्हाणांकडून आज कशेडी बोगद्याची पाहणी

मंत्री चव्हाणांकडून आज कशेडी बोगद्याची पाहणी

सावर्जनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे गेले सात ते आठ महिने सतत पाहणी दौरा करून या कामावर लक्ष ठेवून होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या बोगद्यातील एक बाजू आजपासून छोट्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा कशेडी घाटातील त्रासदायक प्रवास सध्यातरी बंद झाला आहे. याच कामाची पाहणी करण्यासाठी सावर्जनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे मंगळवारी (ता. १२) कशेडी बोगद्याची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे येथील रस्त्याची तसेच बोगद्याच्या कामाची सद्यःस्थिती काय आहे, याची खेड तालुका भाजपच्यावतीने माहिती घेण्यात आली.

गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगदा वाहतुकीसाठी सुरू होणार, अशी चर्चा गेले सहा महिने सुरू होती. अखेर आजपासून या एकेरी वाहतुकीला सुरवात झाली आहे. त्यामुळे याविषयी होत असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कोकणच्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना वेळेत आणि सुरक्षित गणेशोत्सवासाठी पोहचता यावे यासाठी सावर्जनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण हे गेले सात ते आठ महिने सतत पाहणी दौरा करून या कामावर लक्ष ठेवून होते. त्यांच्या कामाचे फलित म्हणून आजपासून या बोगद्यातील गोव्याच्या दिशेने जाणारी एक लेन सुरू करण्यात आली आहे.

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत. कशेडी घाटातील अवघड वळणावर पडलेले खड्डे तसेच घाटातील भोगावनजीक होत असणारे भूस्खलनासंदर्भात त्यांनी पेण विभागाचे कायर्कारी अभियंता धीरज चोरे यांच्याशी चर्चा केली. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आणि बोगद्यातून चारचाकी वाहने हाकत असताना सद्यःस्थितीत वाहनचालकांनी कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे. या संदर्भात देखील माहिती घेतली. तशा पद्धतीच्या सूचनाफलकांची गरज लक्षात घेऊन खेड भाजपच्यावतीने अशा पद्धतीने वाहनचालकांना मार्गदर्शक ठरणारे फलकदेखील लावू.

RELATED ARTICLES

Most Popular