25.8 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeEntertainmentइंस्टाग्राम थेरगाव क्वीनला वाकड पोलिसांनी दाखविला इंगा, ठोकल्या बेड्या

इंस्टाग्राम थेरगाव क्वीनला वाकड पोलिसांनी दाखविला इंगा, ठोकल्या बेड्या

इंस्टाग्राम प्रोफाईलवर अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दोन १८ वर्षीय मुलींना आणि एका मुलाला अटक करण्यात आली आहे.

सोशल मिडीयावर फॉलोअर्स वाढण्यासाठी अनेक जण विविध मार्ग अवलंबत असतात. तर काही जण सोशल मिडीयालाच आपले आयुष्य समजतात. आणि त्याचप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रयत्न सुरु करतात. सध्या जास्त चर्चेत असलेले ‘थेरगाव क्वीन’ प्रकरण.

या नावाच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दोन १८ वर्षीय मुलींना आणि एका मुलाला अटक करण्यात आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यातील अश्लील भाषा ऐकून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी असे या तरुणीने नाव आहे. ही तरुणी पिंपरी चिंचवड भागात लेडी डॉन म्हणून वावरत असे.

आपल्या इंस्टाग्रामवर ५० हजार लाईक्स मिळावे यासाठी अनेक अश्लील शिव्या असणारे व्हिडिओ बनवले. इतक्यावरच टी थांबली नसून, तिने ३०२ म्हणजेच खून करण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे पोलिसांनी तिच्यासह तिला व्हिडियोत मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणींवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.

वादग्रस्त व्हिडिओ तसेच अश्लील भाषा वापरुन ही इंस्टाग्राम क्वीन रिल्स बनवत असे. अश्लील शिवीगाळ साठी ती प्रसिद्ध होती. या क्वीनचे अनेक व्हिडिओ व्हायरल आहेत. मात्र या क्वीनला अश्लील भाषा वापरणे आता भोवलं आहे. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली असून, तिच्यासह अजून दोघांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर सोशल मीडियावर या थेरगाव क्वीनचे फोटो आणि व्हिडियो वेगाने व्हायरल झाले आहेत.

वादग्रस्त आणि अश्लील प्रकारची भाषा वापरून तसेच मुलींना बलाकाराच्या धमक्या देणारे तिचे व्हिडीयोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. व्हिडीओज मधून तिने, ”कुठला डॉन आणि कुठला कोण?  माझ्या नादी लागाल तर करील ३०२” सदर व्हिडिओमध्ये ३०२ म्हणजे खून केल्यानंतर लावले जाणारे कलम असून ”माझ्या नादाला लागाल तर खून केला जाईल” अशा भाषेत ही थेरगाव क्वीन लोकांना धमक्या द्यायची.

सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात हातात बंदूक घेऊन किंवा हत्यारे घेऊन धमकी देण्याचे तरुणांचे व्हिडिओ या पूर्वी देखील समोर आलेले आहेत. थेरगाव क्वीन म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेली साक्षी श्रीश्रीमल हिच्या वर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे आता शहरात भाईगिरी करत व्हिडीयो काढणाऱ्या मंडळींना चांगलाच आळा बसेल.

RELATED ARTICLES

Most Popular