26.2 C
Ratnagiri
Saturday, April 19, 2025

विद्यार्थ्यांच्या शोधात जिल्हा परिषदेचे शिक्षक घरोघरी

नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश...

जिल्हावासीयांचे १२३ प्रश्न निकाली – पालकमंत्री उदय सामंत

रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही, साकव नाही, जागेचा...

प्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

मंडणगड तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध...
HomeChiplunचिपळुणात उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यास प्रारंभ

चिपळुणात उड्डाणपुलावर गर्डर बसवण्यास प्रारंभ

१५० मेट्रिक आणि २५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनची मदत घेतली जात आहे.

चिपळूण शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे काम सुरू झाले आहे. वारंवार झालेल्या अपघातातून बोध घेत यावेळी पूर्ण खबरदारी घेत गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. एक गर्डर दोन क्रेनच्या साहाय्याने जमिनीवरून उचलून तो पिलरवर घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. ही कसरत करताना पुन्हा अपघात होणार नाही याची काळजी महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीकडून घेतली जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चिपळूण सहरातून जातो. बहादूरशेख नाक्यापासून निम्म्या शहरात उड्डाणपूल उभारला जात आहे. उड्डाणपुलाच्या कामात यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. जुन्या डिझाईननुसार उड्डाणपुलाचे काम सुरू असताना गर्डर कोसळून अपघात झाला. त्यानंतर डिझाईन बदलून दोन पिलरच्या मध्यभागी आणखी एक पिलर बांधण्याचे ठरले, जुन्या पिलरचा वरचा भाग तोडत असताना कामगार पडून जखमी झाला होता.

त्यानंतर महामार्ग विभाग आणि उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर चौफेर टीका झाली होती. आता कंपनीने पूर्वीच्या चुकांमधून बोध घेऊन उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. गर्डर उभारण्यापूर्वीचे प्राथमिक काम पूर्ण झाल्यानंतर आता मुख्य गर्डर उभारणीचे कामे सुरू आहे. हे काम करताना असताना महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली जाते. एक गर्डर जमिनीवरून तो पिलरवर ठेवेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो; मात्र ही प्रक्रिया सुरू होण्याच्या पाच मिनिटे आधी दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवली जाते. २०२५ अखेर शहरातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. यासाठी १५० मेट्रिक आणि २५० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनची मदत घेतली जात आहे.

असे चालते कामकाज – गर्डर उभारणीचे काम वेगात करण्यासाठी क्रेन आणि ब्लॉक यांचा वापर केला जात आहे. ओव्हरहेड आणि गॅन्ट्री क्रेनचे संयोजन करून अर्ध-गॅन्ट्री क्रेन तयार केली जाते. या क्रेनमध्ये पूल, ट्रॅक, ट्रॉली आणि उभारणी यंत्रणा असते. दोन महाकाय क्रेनच्या साहाय्याने उड्डाणपुलावरील गर्डर चढवले जातात.

RELATED ARTICLES

Most Popular