29.9 C
Ratnagiri
Wednesday, March 12, 2025

देवरहाटीच्या जमिनी परत करा ! रत्नागिरीमध्ये घंटानाद आंदोलन

देवरहाटीच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या आहेत. त्या...

छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक व्हावे – प्रमोद जठार

संभाजी महाराजांनी ११ मार्च १६८९ मध्ये बलिदान...

दापोलीमधील वाहतुकीची गती मंदावली…

येथील एसटी बसस्थानक ते बुरोंडीनाका या परिसरातील...
HomeRatnagiriएकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पदासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प,पदासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लांजा या प्रक्रल्पातील अंगणवाडी सेविका/मदतनीस रिक्त पदे मानधनी सेवा तत्वावर भरण्यासाठी संबंधित महसूल गावातील स्थानिक रहिवासी पात्र महिला अर्जदारांकडून दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना लांजा येथे समक्ष जमा करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांनी केले आहे. लांजा प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका रिक्त पदांचा अंगणवाडीनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे. आंजणारी ग्रामपंचायतमधील आंजणारी मधलीवाडी अंगणवाडी केंद्र, शिपोशी ग्रामपंचायत शिपोशी हनुमानवाडी, सालपे ग्रामपंचायत सालपे बौध्दवाडी अंगणवाडी, गोळवशी ग्रामपंचायत गोवळशी बौध्दवाडी अंगणवाडी, कोंड्ये ग्रामपंचायत कोंड्ये पालयेवाडी अंगणवाडी, कुर्णे ग्रामपंचायत कुर्णे अंगणवाडी, विवली ग्रामपंचायत विवली अंगणवाडी केंद्र.

लांजा प्रकल्पांतर्गत अंगणवाडी मदतनीस रिक्त पदांचा अंगणवाडीनिहाय तपशिल पुढीलप्रमाणे आहे. मठ ग्रामपंचायतमधील मठ कुंभारगाव, निवसर ग्रामपंचायतमधील निवसर न.2, निवसर नं.3, निवसर नं.1 अंगणवाडी, वेरळ ग्रामपंचायतमधील वेरळ मुस्लिमगाव, वेरळ गायदळी अंगणवाडी, देवधे ग्रामपंचायतमधील देवधे गुरववाडी, आंजणारी ग्रामपंचायतीमधील शिरंबवली अंगणवाडी, कोलधेमधील कोलधे कुंभारगाव, जावडे ग्रामपंचायतीमधील जावडे कातळवाडी, शिपोशी ग्रामपंचायतीमधील शिपोशी बाईंगगाव, शिपोशी सुतारवाडी अंगणवाडी, कोचरीमधील कोचरी बेंद्रवाडी, सालपेमधील सालपे घागवाडी अंगणवाडी, पालु ग्रामपंचायतीमधील पालु बौध्दवाडी, चिंचुर्टि हुबरवणे, बेनीमधील खेरवसे जाधववाडी, वाडगावमधील हसोळ अंगणवाडी, कणगवली ग्रामपंचायतीमधील कणगवली बौध्दवाडी, कणगवली मोहल्ला, तळवडे ग्रामपंचायतीमधील तळवडे मालदारवाडी, कुरचुंबमधील कुरचुंब सुवारेवाडी, कोंड्ये ग्रामपंचायतीमधील कोंड्ये रांबाडेगाव, कोंड्ये कातळवाडी, कोंड्ये बौध्दवाडी अंगणवाडी, गोळवशीमधील गोळवशी नं.2, इसवली ग्रामपंचायतीमधील इसवली पाथरवाडी, रुणमधील रुण गोधवली.

साटवलीमधील साटवली लावगण अंगणवाडी, भांबेड ग्रामपंचायतीमधील भांबडे सहकारभवन, भांबेड दिवाळेवाडी, वेरवली बु.मधील वेरवली बु.डोळसगाव, हर्दखळेमधील हर्दखळे सुकाळवाडी,वेरवली  खु. ग्रामपंचायतीमधील पडवण बौध्दवाडी, वेरवली खु.राणेवाडी, वेरवली खु. खुलमवाडी अंगणवाडी, प्रभानवल्ली ग्रामपंचायतीमधील प्रभानवल्ली नांगरफळे, प्रभानवल्ली गणेशखोर, प्रभानवल्ली येरडववाडी अंगणवाडी, आसगे ग्रामपंचायतीमधील आसगे शिंदेवाडी, गोविळमधील गोविळ राववाडी. कुर्णे ग्रामपंचायतीमधील कुर्णे घडशीगांव, कुर्णे पड्यारगाव अंगणवाडी, पुनस ग्रामपंचायतीमधील पूनस कोंड, पुनस गौतमगाव, पुनस वेसुर्ले अंगणवाडी, आगवेमधील आगवे रायकरवाडी, वाघ्रटमधील वाडीलिंबू पाष्टेवाडी, वाघ्रट भोवडवाडी अंगणवाडी, खानवलीमधील लावगण कालकरवाडी.

खानवली चौकेकरवाडी, खानवली बोरवाडी अंगणवाडी, भडे ग्रामपंचायतीमधील भडे वारपट, भडे पेवखल, हर्चे ग्रामपंचायतीमधील हर्चे उभावाडा, हर्चे रायकरवाडी, हर्चे शेळवी अंगणवाडी, कोट ग्रामपंचायतीमधील कोट बौध्द घडशीवाडी, व्हेळ ग्रामपंचायतीमधील व्हेळ सडेवाडी, व्हेळ मधलीवाडी, व्हेळ मुगरुणवाडी अंगणवाडी, वाकेड ग्रामपंचायतीमधील वाकेड, वाकेड मावळतवाडी. बोरथडे अंगणवाडी, रिंगणे ग्रामपंचायत रिंगणे कोंडगाव, रिंगणे पाटीलगाव अंगणवाडी, कोंडगे ग्रामपंचायतीमधील कोंडगे खोरगाव, कोंडगे पहिलीवाडी अंगणवाडी, विलवडे ग्रामपंचायतमधील विलवडे कोंड, विलवडे सुतारवाडी अंगणवाडी, वाघणगाव ग्रामपंचायतीमधील वाघणगाव सुतारवाडी, शिरवलीमधील वरची शिरवली, कुरुंगमधील कुरुंग बांधवाडी, वनगुळे ग्रामपंचयतीमधील वरगुळे खालचीवाडी, खानवली ग्रामपंचायतीमधील खानवली चिंचवाडी आणि माजळ ग्रामपंचायतीमधील माजळ अंगणवाडी. अधिक माहितीसाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, लांजा येथे संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular