29.9 C
Ratnagiri
Sunday, December 29, 2024

खेडमध्ये तरुणाचा मृतदेह न्यावा लागला दीड किलोमीटर वाहून

खेड- तळे मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार...

डॉ. मनमोहन सिंग पंचत्वात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी दिल्लीतील...

संगमेश्वरात दोन कारमध्ये अपघात, ७ जखमी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि...
HomeRatnagiriरत्नागिरीत परराज्यातील १० संशयितांची चौकशी, बेकायदेशीर वास्तव्य

रत्नागिरीत परराज्यातील १० संशयितांची चौकशी, बेकायदेशीर वास्तव्य

नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची टीप मनसेला मिळाली आहे.

शहरातील राजीवडा येथे पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील १० नागरिक राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. झाडू विकण्याच्या बहाण्याने हे नागरिक इथे वास्तव्य करत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. परराज्यातील असल्याच्या संशयावरून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची शहर पोलिसांकडून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहर आणि तालुक्यात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. तालुक्यातील नाखरे येथे चिरेखाणीवर १३ बांग्लादेशीय सापडले होते. याची चौकशी केल्यानतंर यांच्याकडे कोणतेही भारतीय नागरिकत्व नसताना आणि अधिकृत कागदपत्र नसताना त्यांचे येथे वास्तव होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना बांग्लादेशाला पाठवण्यासाठी शासनाची परवानगी मागवण्यात आली आहे; परंतु अशा प्रकारे बांग्लादेशीय, रोहिंगे आर्दीचे जिल्ह्यात बेकायेदशीर वास्तव असल्याची माहिती पोलिस दलाकडे आहे. त्यामुळे पोलिस दलाने जिल्ह्यास सर्वत्र अशाप्रकारे काम करणाऱ्या आणि कोणतीही भारतीय ओळख नसणाऱ्यांचा शोध सुरू ठेवला आहे.

मनसेने यामध्ये उडी मागली होती. अशाप्रकारे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यांचा शोध घेऊन आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांची शोधमोहीम सुरू आहे. शहरामध्ये झाडू विकरणारे काही परराज्यातील नागरिक फिरत असल्याची माहिती मनसेला मिळाली. त्यांनी त्यांची चौकशी केली असता असमाधानकारक उत्तरे दिली. भारताचे नागरिक असल्याची ओळख काय आहे, असे विचारल्यानंतर त्यांनी आधारकार्ड दाखवली; परंतु आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची शहर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ते परराज्यातील असून बेकायदेशीर वास्तव्यास असल्याच्या संशय आहे. राजीवड्यामध्ये हे दहा लोक राहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी काही नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची टीप मनसेला मिळाली आहे. तोही प्रकार लवकरच उघड होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular