27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriकुंडीतील 'त्या' जमीन व्यवहाराची चौकशी सुरू - पालकमंत्री उदय सामंत

कुंडीतील ‘त्या’ जमीन व्यवहाराची चौकशी सुरू – पालकमंत्री उदय सामंत

२०१५ ला झालेले असे आणखी किती जमिनीचे व्यवहार झाले आहेत ते देखील शोधून काढले पाहिजेत.

संगमेश्वर तालुक्यातील कुंडी व निगूडवाडी या गावातील जमीन खरेदी-विक्री गैरव्यवहाराबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने ३० दिवसांत पारदर्शकपणे चौकशी करून अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपायुक्त महसूल विवेक गायकवाड, सदस्य तथा अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त अंजली पवार या त्रिसदस्यीय समितीसमवेत आज बैठक झाली.

या वेळी खासदार विनायक राऊत, उपजिल्हाधिकारी (सा. प्र. ) शुभांगी साठे, विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी, जीवन देसाई, वैशाली माने, उपवनसंरक्षक दीपक घाटगे, तहसीलदार अमृता साबळे आदी उपस्थित होते तसेच समितीचे अध्यक्ष गायकवाड हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. याबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले समितीने बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे.

समितीने त्या संदर्भात सुनावणी घ्यावी. २०१५ ला झालेले असे आणखी किती जमिनीचे व्यवहार झाले आहेत ते देखील शोधून काढले पाहिजेत. बनावट अंगठे, सह्यांचादेखील तपास करावा शिवाय तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीबाबत चौकशी करावी. शेतकऱ्यांना न्याय देताना या समितीने नियमानुसार पारदर्शकपणे चौकशी करावी.

RELATED ARTICLES

Most Popular