पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा टी डब्लू जेच्या संचालकांना पाठीशी घालत आहे. ३१ डिसेंबर पूर्वी यांना अटक झाली नाही तर मग आमचा उद्रेक पहावयास मिळेल. राजकारणी पोलीस, बडे अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची नावे जाहीर करणार आणि चिपळूण पोलीस स्थानकासमोर आम्ही आत्मदहन करणार.. असा इशारा गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलीस स्थानकात येऊन दिला. गुंतवणूकदारांचे उग्ररूप यावेळी पहावयास मिळाले. मोठं मोठ्या कमिशनचे आश्वासन दाखवून काही वर्षात ग्राहकांचे हजारो कोटी रुपये डूबवणाऱ्या या कंपनी विरोधात ठोस कारवाई झालेली नाही असा ग्राहकांचा आरोप आहे. केवळ चिपळूणमधून सुमारे बाराशे ते पंधराशे कोटी रुपये ग्राहकांचे अडकले असल्याने अनेकजण उद्धवस्त झाले असून ते सारे सोमवारी पोलीस स्थानकात धडकले होते.
ग्राहकांवरच गुन्हा – टी डब्लू जे चे संचालक संकेत घाग फरार असल्याने गुंतवणूकदार सौ. शैलजा चव्हाण यांनी त्याच्या घरी जाऊन आई वडील यांच्याकडे चौकशी करीत तुमचा मुलगा कधी येणार आहे? कुठे आहे, आमचे पैसे कधी देणार आहे ? अशी चौकशी करताच त्याच्या आई वडीलांनी धमक्या दिल्याची तक्रार पोलीस स्थानकात दिली होती आणि सोमवारी त्यांना बोलावण्यात आले होते.
गुंतवणूकदार धडकले – सौ. चव्हाण यांना पोलीस स्थानकात बोलावताच शेकडो गुंतवणूकदार सौ. चव्हाण यांच्या सम वेत बाजूने पोलीस स्थानकात धडकले. यावेळी पोलीस आणि गुंतवणूकदार यांच्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली तर संकेत घाग याच्या आईवडिलांना ही यावेळी धारधार शब्दात सुनावण्यात आले. सौ. चव्हाण यांच्याविरूद्ध तक्रार दिल्याने गुंतवणूकदार आक्रमक झाले आहेत.
वडील ही पार्टनर – टी डब्लू जे या कंपनीत संकेत घाग या संचालकांचे वडील ही पार्टनर असल्यांचा बॉण्ड पेपर दाखवून जर हे या कंपनीत पार्टनर असतीले तर आम्ही यांना आमचे पैसे कधी मिळतील हे विचारायचे नाही का असा सवालही सौ चव्हाण आणि संचालकांनी करीत आमच्या तक्रारीची दखल कोण घेत नाही आणि याच्या तक्रारीची मात्र लगेच दखल पोलीस घेतात कसे असा सवालही त्यांनी केला.
आर्थिक गुन्हे शाखा पाठीशी – आम्ही तक्रार करून आज किती दिवस झाल? बघा, पंचवीस संचालक आहेत, पैकी तीन चार जणांना बेल मिळाला. उर्वरितांना अटक झाली नाही. कारवाई करीत आहोत असे सांगून आम्हालाच पळवून लावले जात आहे. ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखा आरोपींना पाठीशी घालत आहेत. राजकारणीही यामध्ये समाविष्ट आहेत, असा आरोप संतप्त गुंतवणूकदारांनी यावेळी जाहीरपणे केला.
३१ रोजी उघड करणार – आपण या साऱ्यांची पोलखोल ३१ डिसेंबरला करणार आहोत. पोलीस, राजकारणी अधिकारी यांनी किति पैसे गुंतवले, किती परतवा घेतला हे जनतेसमोर आपण ठेवणार आहोत. तेही बैंक स्टेटमेंट असणार असून सर्वांचे चेहरे समोर मी आणणार आहे जनतेलाही कळू दे, यामध्ये कोण कोण आहेत आणि किती पैसे गुंतवले आहेत ते असे सौ. शैलजा चव्हाण यांनी ठणकावून सांगितले.
तर आत्मदहन – संशयित आरोपी समीर नार्वेकर, त्याची बायको, संकेत घाग यांना जर ३१ डिसेंबरपूर्वी अटक झाली नाही तर मग आम्ही सारे गुंतवणूकदार चिपळूण पोलीस स्थानकासमोर येऊन सार्वजनिक आत्मदहन करणार असल्याचे सौ. चव्हाण यांनी सांगून आम्ही उद्धवस्त झालो आहोत, आम्ही जगून काही उपयोग नाही असे सांगून या ठिकाणी तुम्हाला उद्रेक पहावयास मिळेल असे त्यानी शेवटी सांगितले.

