27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeIndiaआज अनेक खेळाडूंच्या नशीबाचे तारे चमकणार, आयपीएल लिलाव २०२२

आज अनेक खेळाडूंच्या नशीबाचे तारे चमकणार, आयपीएल लिलाव २०२२

मार्की खेळाडूंच्या यादीत चार भारतीय खेळाडू, तसेच सहा परदेशी खेळाडूचाही समावेश आहे.

आजपासून आयपीएल मेगाऑक्शन सुरू होत आहे. शेवटचा मेगा लिलाव २०१८ मध्ये झाला होता. त्यावेळी लिलावात ८ संघांनी भाग घेतला होता. पण यावेळी १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या पहिल्या यादीत ५९० खेळाडू होते, मात्र लिलावापूर्वी आणखी १० खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण ६०० खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत.

बंगळुरू येथे होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावात आज अनेक खेळाडूंच्या नशीबाचे तारे चमकणार आहे. पहिल्या १० मार्की खेळाडूंना लिलावात स्थान दिले जाईल. यानंतर उर्वरित खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अग्निवेश अयाची, हार्दिक तैमोर, अ‍ॅरॉन हार्डी, लान्स मॉरिस, रोहन राणा, साईराज पाटील, निवेथान राधाकृष्णन,  नितीश कुमार रेड्डी, मिहीर हिरवानी, मोनू कुमार, या दहा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मार्की खेळाडूंच्या यादीत चार भारतीय खेळाडू, तसेच सहा परदेशी खेळाडूचाही समावेश आहे. या सर्व खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात येणार असल्याचे समजते.

लिलावादरम्यान प्रथम बोली लावणाऱ्यांना मार्की खेळाडू असे संबोधले जाते. या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्येही मैदान गाजवलेले असते. या खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यर, शिखर धवन, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन,  क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा, फाफ डू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स आणि ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे.

लिलावासाठी प्रत्येक संघाकडे ९०  कोटी रुपये होते, जास्तीत जास्त ४ खेळाडू कायम ठेवण्यात आले होते, ९० कोटी रुपयांच्या पर्समधून ४२ कोटी रुपये मायनस होतात. कोणत्याही संघातील पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम ठेवण्यासाठी १६ कोटी रुपये, दुसऱ्या पसंतीच्या खेळाडूला कायम ठेवण्यासाठी १२ कोटी रुपये, तिसऱ्या आणि चौथ्या खेळाडूला कायम ठेवण्यासाठी अनुक्रमे ८ कोटी आणि ६ कोटी रुपये द्यावे लागतात.

त्याचप्रमाणे, मागील वर्षापासूनच्या कोरोनाच्या संकटामुळे या आयपीएल लिलावात अनेक स्टार खेळाडू दिसणार नाहीत. बहुतांश खेळाडूंनी वर्कलोड आणि कोरोना, आयपीएल बायो बबलमुळे आलेला थकवा आणि स्पर्धेपूर्वी क्वारंटाईनच्या अनेक समस्यांमुळे आपली नावे मागे घेतली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular