26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeSportsआयपीएलचा महाकुंभमेळा आजपासून १० संघ, ७४ सामन्यांची मेजवानी

आयपीएलचा महाकुंभमेळा आजपासून १० संघ, ७४ सामन्यांची मेजवानी

रविवारी आणि शनिवारी प्रत्येकी दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे.

नवे नियम, नवे कर्णधार पण पूर्वीचाच उत्साह, जल्लोष उत्सुकता असलेल्या बहुचर्चित आयपीएलच्या १८व्या हंगामाचा महाकुंभमेळा उद्यापासून सुरू होत आहे. गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळूर यांच्यात सलामीला बार उडेल; पण या सामन्यावर पावसाचेही सावट आहे. १० संघ, ६५ दिवस ७४ सामने, १३ ठिकाण असा हा आयपीएलचा धमाका असणार आहे. २२ मार्च ते २५ मे असा कालावधी असलेल्या या स्पर्धेत काही रविवारी आणि शनिवारी प्रत्येकी दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. दुपारचे सामने ३.३० तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता सुरू होणार आहेत.

दोन चेंडू – रात्रीच्या सत्रात बहुतांशी ठिकाणी दवाचा फटका दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला बसतो, त्यामुळे गोलंदाजीसाठी नाणेफेकीच्या कौलला अतिशय महत्त्व मिळत असते. आता असे असणार नाही. दुसऱ्या सत्रात गोलंदाजी करणाऱ्या संघाला ११ षटकांनंतर दुसऱ्या चेंडूचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे गोलंदाज आपली करामत दाखवू शकतील. दोन चेंडूंचा हा नियम पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही दिशादर्शक ठरू शकतो.

डीआरएसची व्याप्ती वाढली – डीआरएस आता केवळ मोजक्याच घटनांसाठी वापरला जायचा; पण यंदाची त्याची व्याप्ती वाढवून अचूकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. वाईड ठरणाऱ्या चेंडूंची उंची तसेच ऑफ साईडला टाकलेले चेंडू वाईड आहेत की नाही हेसुद्धा आता डीआरएसमार्फत तपासले जाऊ शकतील.

महागड्या पंतवर लक्ष – आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पंतवर अधिक लक्ष आहे. २७ कोटी रुपये मोजून लखनौ संघाने त्याला संघात घेतले आणि कर्णधारपदही दिले. इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आणि चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याला आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

नवे कर्णधार – आयपीएलमधील १० पैकी सात संघांचे कर्णधार जवळपास नवे असणार आहेत. विशेष म्हणजे, १० पैकी नऊ कर्णधार भारतीय आहेत. पॅट कमिंस हा एकमेव परदेशी कर्णधार आहे.

बंगळूर : रजत पाटिदार यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे नेतृत्व करणार आहे. तो देशाकडून अजून द्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

अक्षर पटेल : अक्षर पटेल प्रथमच नेतृत्वाच्या भूमिकेत असेल. केएल राहुल हा लखनौ संघाचा माजी कर्णधार संघात असतानाही अक्षरकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सॅमसन आणि पराग : राजस्थान हे पहिल्यावहिल्या आयपीएलचे विजेते नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. संजू सॅमसन हा त्यांचा अगोदर घोषित कर्णधार आहे; परंतु पहिल्या तीन सामनांसाठी रियान परागची कर्णधारपदी नियुक्ती केली.

श्रेयस अय्यर : कोलकाता संघाला गतवर्षी आयपीएल करंडक जिंकूनही त्यांच्या संघात कायम न राहिलेला श्रेयस अय्यर आता पंजाब किंग्सचा कर्णधार आहे.

मुंबईची सुरुवात सूर्याकडून – हार्दिक पंड्या हा मुंबईचा कर्णधार असला तरी त्याच्यावर एका सामन्याची बंदी असल्याने त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई संघाचे नेतृत्व करून मोसमाची सुरुवात करणार आहे.

प्रशिक्षकांचीही अदलाबदल – या आयपीएलमध्ये अदलाबदल झालेल्या प्रशिक्षकांचीही क्षमता पणास लागणार आहे. गेल्या मोसमापर्यंत दिल्लीचे प्रशिक्षक असलेले रिकी पाँटिंग आता पंजाब संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. दिल्लीची जबाबदारी हेमांग बदानींकडे देण्यात आली आहे. केविन पीटरसन हे दिल्लीचे मेंटॉर असणार आहेत तर ग्रेट राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत. गौतम गंभीर भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या मेंटॉरपदी द्वेन ब्रावो नियुक्त आहेत. ब्रावो हे चेन्नईचे प्रमुख खेळाडू राहिलेले आहेत. माहेला जयवर्धने पुन्हा मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular