23.5 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeKokanआयआरसीटीसीची सेवा तासभर बंद; रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप

आयआरसीटीसीची सेवा तासभर बंद; रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप

साईटवरील हा पर्याय २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे.

आयआरसीटीसीची सेवा सोमवारी सकाळी १० च्या सुमारास एक तासभर अचानक ठप्प झाली. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे तासभर ही सेवा बंद करण्यात आली होती. यामुळे लाखो प्रवाशांना तिकीट बुक करता न आल्याने त्रस्त झाले होते. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) सेवेवर परिणाम झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना बुकिंग करता आले नाही, तर अनेकांचे बुकिंग रद्द आपोआप झाले. बराच वेळ डाऊनटाईम मेसेज वेबसाईटवर झळकत होता. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, प्रवाशांना २४ तास नवीन खाते तयार करता येणार नाही. तब्बल तासभर बंद असलेले आयआरसीटीसीची सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू झाली असली, तरी प्रवाशांना २४ तासांपर्यंत नवीन खाते तयार करता येणार नाही.

साईटवरील हा पर्याय २४ तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. नवीन नोंदणीव्यतिरिक्त विद्यमान खात्याचा पासवर्ड बदलण्याचा पर्यायही या काळात उपलब्ध होणार नाही. आयआरसीटीसीची वेबसाइट आणि अॅप या दोन्हीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. सकाळी १० पासून तिकीट बुकिंग सेवा बंद होती. यामुळे तत्काळ तिकिटे बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तत्काळ तिकिटांचे बुकिंग ऑनलाइन अप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना करता आले नाही. त्यामुळे अडचणीचा सामना करावा लागला.

RELATED ARTICLES

Most Popular