25.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeDapoliदापोली परिसरात रहदारीचे संकट खड्ड्यावर लोखंडी 'प्लेट'

दापोली परिसरात रहदारीचे संकट खड्ड्यावर लोखंडी ‘प्लेट’

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील बसस्थानक परिसर आणि दापोली-खेड महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोठा खड्डा पडलेला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ लोखंडी प्लेट टाकून आणि बॅरिकेडस् लावून तात्पुरता तोडगा काढल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या डागडुजीबद्दल स्थानिक नागरिक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत. खेडकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डा दुरुस्त करण्याऐवजी त्यावर मोठी लोखंडी प्लेट ठेवून बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. परिणामी रस्त्याचा मोठा भाग अडवला गेल्याने वाहतुकीसाठी फक्त एक अरुंद मार्ग शिल्लक राहिला आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. यात भर म्हणून बॅरिकेडस्च्या बाजूला काही वाहनधारक अवैध पार्किंग करतात. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. मागून येणाऱ्या वाहनांचा पार्क केलेल्या गाड्यांवर धडकण्याचा धोका कायम असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

नागरिक, प्रवाशांमध्ये असंतोष – नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने असंतोष वाढला आहे. दापोलीतील रहिवासी आणि प्रवासी यांची मागणी आहे की, संबंधित विभागाने तातडीने या खड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका दूर करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular