26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriजनआरोग्यचे लांज्यात रुग्णालयच नाही, फक्त योजनेचे झळकताहेत फलक

जनआरोग्यचे लांज्यात रुग्णालयच नाही, फक्त योजनेचे झळकताहेत फलक

सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी जनआरोग्यचे लांज्यात रुग्णालयच नाही जनआरोग्य योजना सुरू केली आहे

तालुक्यात योजनेचे फक्त झळकताहेत फलक; सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी जनआरोग्यचे लांज्यात रुग्णालयच नाही जनआरोग्य योजना सुरू केली आहे; परंतु लांजा तालुक्यात मात्र यासाठी एकही रुग्णालय उपलब्ध नाही. त्यामुळे योजनेतील लाभ तालुक्यातील जनतेला मिळत नाही. लांजा-साटवली मार्गावर ग्रामीण रुग्णालयाबाहेर योजनेच्या माहितीचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. हा एकप्रकारे सर्वसामान्यांच्या थट्टेचाच प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

डोंगरी भागात लांजा तालुका असल्याने नागरिकांना बाहेर जाऊन उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. डायलिसिससारख्या उपचारपद्धतींसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. बऱ्याचवेळा आर्थिक अडचणींमुळे रुग्णांना उपचार घेणे शक्य नसल्याने मृत्यू ओढावतो याबाबत प्रशासनाने गांभीर्याने महात्म जोतिबा फुले जनआरोग्य योजनेकरिता तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून सतत होत आहे तालुकानिहाय विचार केल्यास लांजा तालुक्यात फार मोठे उत्पन्नाचे स्रोत नसल्याने तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये उपचार करावे लागतात.

यामध्ये आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. गेली अनेक वर्षे तालुकावासीय या योजनेपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे लांजा तालुक्यात लवकरात लवकर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध सुविधा असणारे हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular