27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriजे.के. फाईल्स कंपनीच्या १७ एकर जागेत नवा उद्योग आणू - उद्योगमंत्री उदय...

जे.के. फाईल्स कंपनीच्या १७ एकर जागेत नवा उद्योग आणू – उद्योगमंत्री उदय सामंत

कंपनीची ही जागा कोणत्या बिल्डरच्या किंवा कंपनीच्या घशात घातली जाणार नाही.

साऊथ अफ्रिकेतील निर्याद बंद झाल्यामुळे जे. के. फाईल्स कंपनी बंद पडला. याबाबत अनेकांचा गैरसमज आहे. कंपनीची ही जागा कोणत्या बिल्डरच्या किंवा कंपनीच्या घशात घातली जाणार असल्याची बोलले जाते. परंतु असे काही होणार नाही. कंपनीच्या या १७ एकर जागेत कोणतातरी नवा उद्योग आणला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, जे. के. फाइल्स कंपनी का बंद पडली याबाबत कोणी माहिती घेतलेली नाही. या कंपनीचा माल साऊथ अफ्रिकेला मोठ्या प्रमाणात निर्यात केला जात होता.

परंतु कोरोना नंतर साऊथ अफ्रिकेला माल जाणे बंद झाले. त्याचा मोठा फटका कंपनीला बसला आणि हळुहळु कंपनीची युनिट बंद पडत गेली. बंद पडत असलेली युनिट पुन्हा सुरू करण्याबाबत प्रयत्न झाला. परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाशी बैठका झाल्यानंतर कामगारांना जो फरक मिळणार होता. त्यापेक्षा जास्त फरत मिळवून देण्यात आम्हाला यश आले. कामगारांना चांगले पैसे मिळाल्यानंतर कंपनीच्या मागण्या मान्य करत दोनशे कामगारांना मोबदला मिळाल्यानंतर ते बाहेर पडले.

त्यामुळे कंपनी बंद पडली आहे. कंपनीची ही सतरा एकर जागा कोणत्यातरी बिल्डरच्या किंवा अन्य कंपनीच्या घशात घातली जाणार अशी ओरड होती. मात्र सर्वांचा हा गैरमज़ दूर करतो. एमआयडीसीची ही जागा असून कंपनीशी चर्चा करून या जागेत कोणताही दुसरा उद्योग आणावा, यासाठी आम्ही आग्रही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular