24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeKhedकशेडी घाटात टँकरची खासगी आरामबससह टेम्पोला धडक

कशेडी घाटात टँकरची खासगी आरामबससह टेम्पोला धडक

टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या खासगी आरामबसला धडक दिली.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील आंबा पॉईंटजवळ मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास तेल वाहतुकीचा टँकरने खासगी आरामबससह टेम्पोला धडक देत अपघात केला. अपघातात टँकरचालक सुफियान नसीम अहमद (रा. उत्तरप्रदेश) यास किरकोळ दुखापत झाली. टँकरचालक सुफियान अहमद हा तेल वाहतुकीचा टँकर घेवून महाड येथून गोवा येथे जात होता. टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या खासगी आरामबसला धडक दिली. यानंतर टेम्पोलाही पाठीमागून धडक दिली.

अपघातामुळे काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अपघाताचे वृत्त कळताच कशेडी येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक पी.एस. धडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समेळ सुर्वे यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजुला हटवून मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.

RELATED ARTICLES

Most Popular