28.4 C
Ratnagiri
Friday, October 25, 2024
HomeKhedजगबुडी इशारा पातळीच्या वर गेल्याने धाकधूक

जगबुडी इशारा पातळीच्या वर गेल्याने धाकधूक

पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाले.

सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला होता. जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर वाहत होती. पावसाचा जोर कायम राहण्यास खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी’ धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रशासनाने सावधानतेचा इशाराराही दिला. मात्र दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. पुराची भिती टळल्याने व्यापाऱ्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. पावसामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. शिवतर मार्गावर अरुंद गटारांमुळे पाणी रस्त्यावरती येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण खेड दापोली भागात शुक्रवारपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाले. मात्र सद्यस्थितीत पावसाने उसंत घेतल्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ब्रेड – शिवतर मार्गावर, चाकाळे गावानजीक रस्त्यावर पाणी साचले. खेड शवतर मार्गावर वाहतुकीवर याचा परिणाम झाला. मुसळधार पावसाने शनिवारी पुन्हा अस्तान-धनगरवाडी रस्त्यावर माती आली. ती काढण्याचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular