27.3 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeRatnagiriमुख्य संशयिताचे वडील ताब्यात, जयगड तिहेरी खून प्रकरण

मुख्य संशयिताचे वडील ताब्यात, जयगड तिहेरी खून प्रकरण

भक्ती मयेकरचा मोबाईलही हाती लागला आहे.

जयगड येथील तिहेरी खूनप्रकरणी अटकेतील मुख्य संशयित आरोपीच्या वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयिताच्या कृत्याला साथ दिल्याप्रकरणी पोलिसांनी दुर्वासचे वडील दर्शन पाटील यांना गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असून, भक्ती मयेकरचा मोबाईलही हाती लागला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात आणि भक्तीच्या संपर्कात कोण कोण होते, हे तपासात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भक्ती मयेकर खून प्रकरण वगळता इतर दोन खुनांच्या गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांच्याकडे दिला मिरजोळे येथील भक्ती जितेंद्र मयेकर (वय २६) हिचे दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी, वाटद खंडाळा) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून भक्तीने दुर्वासकडे लग्नासाठी तगादा लावला. दुर्वासने तिला फोन करून खंडाळा येथे त्याच्या मालकीच्या सायली देशी बारमध्ये बोलावले. दुर्वास आणि विश्वास यांनी बारच्या वरच्या खोलीत भक्तीचा केबलने गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी संशयित सुशांत नरळकर याच्या मोटारीतून मृतदेह आंबा घाटात फेकून दिला.

तसेच याच बारमध्ये २९ एप्रिल २०२४ दुर्वास पाटील आणि त्याच्या साथीदारांनी कळझोंडी येथील रहिवासी सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५) यांची हत्या केली होती. हे दर्शन पाटील यांना माहित होते. त्यामुळे वीर यांचाही खून झाल्याचे जितेंद्र जंगम याला माहीत होते. त्याने कुठेही बोलू नये म्हणून दुर्वास पाटील याने त्याचाही खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिला, याची कल्पना दर्शन पाटील याला होती. त्यानी दुर्वास पाटील यांच्या वाईट कृत्यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येते, असा पोलिसांचा संशय आहे. वीर हे संशयित दुर्वास पाटीलच्या मैत्रिणीला वारंवार फोन करून त्रास देत होते. याच रागातून संशयित दुर्वास पाटील, विश्वास विजय पवार (४१) आणि राकेश अशोक जंगम (२८) यांनी संगनमत करून सीताराम वीर यांना हाताने आणि काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिन्ही संशयितांनी वीर यांना चक्कर आल्याचे कारण सांगून रिक्षाने त्यांच्या घरी पाठवले; मात्र घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

हे प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी संशयितांनी इतर कामगारांनाही धमकी दिली होती. खुनात मदत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला बडतर्फ करा आपला मुलगा दारूवाल्या दुर्वास पाटीलने नेला आहे, त्याला ताब्यात घ्या, असे वारंवार सांगूनही जयगडचे पोलिस उपनिरीक्षक पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. माझ्या मुलाच्या खुनाकडे श्री. पाटील यानी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी वाटद खंडाळा, कोकणनगर (ता. रत्नागिरी) येथील हत्या झालेला राकेश जंगम याची आई वंदना जंगम यांनी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular