22.4 C
Ratnagiri
Monday, January 30, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRajapurआधी पुनर्वसन करा मगच धरणाचे काम करा, प्रकल्पग्रस्थांचा इशारा

आधी पुनर्वसन करा मगच धरणाचे काम करा, प्रकल्पग्रस्थांचा इशारा

काजिर्डा परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी धडक देत काम बंद पाडले.

जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे कानाडोळा करून प्रकल्पाचे काम सुरू असल्याने संतप्त झालेल्या काजिर्डा ग्रामस्थांनी आज बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी धडक देत प्रकल्पाचे काम बंद पाडले. जामदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत गेले काही महिने अर्ज, विनंत्या, आंदोलन करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर बुधवारी काजिर्डा परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पस्थळी धडक देत काम बंद पाडले. तसेच प्रकल्पस्थळी कामासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्व गाड्या तेथून हटविण्यास भाग पाडले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र प्रकल्पग्रस्तांनी शांततेत आंदोलन करत काम बंद पाडले.

पुनर्वसन न झाल्यास गावातील सात-आठशे कुटुंब उध्वस्त होणार आहेत. पुनर्वसनाबाबत कोणतीही तयारी नसताना घरांची मोजणी करण्यात येत आहे. मोजणी करून प्रकल्पग्रस्तांना मोबदला देऊन तिथून हलवले जाईल,  मात्र पुनर्वसनच झाले नाही तर प्रकल्पग्रस्त जाणार कोठे,  त्यामुळे आधी पुनर्वसन करा मगच धरणाचे काम करा, असा इशारा देतानाच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रकल्पाचे काम सुरू करायचे नाही,  असा सज्जड दम यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी ठेकेदाराला दिला आहे.

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू केल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार राहिल, असा इशारा यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे. कारण अनेकदा अर्ज, विनंत्या करून देखील जर शासन आमच्याकडे दुर्लक्षच करणार असेल तर, याप्रकारेच आंदोलनाचे पाउल उचलणे आमच्यासाठी क्रमप्राप्त असल्याचे तेथे उपस्थित ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular