अस म्हटलं जाते कि त्या त्या हंगामानुसार मिळणाऱ्या फळ आणि भाज्यांचे आहारात सेवन करावे. उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात रसदार फळे उपलब्ध होता. त्यातीलच एक म्हणजे जांभूळ. जांभळाचे सेवन प्रत्येकाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. अनेक आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी जांभळाचा वापर केला जातो. जांभूळ हे फळ मधुमेह, अतिसार, मुरडा, संग्रहणी, याकृत रोग, मुतखडा आणि रक्तजन्य विकारांवर अतिशय उपायकारक आहे. जांभूळ खाण्याचे विविध फायदे शरीराला होत असतात.
जांभळामध्ये अँटी डायबेटीक गुणधर्म असतात. त्यात असलेल्या अल्कोलीड्स केमिकलमुळे स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यास अटकाव होतो आणि म्हणूनच रक्तातील साखरेची पातळीवर नियंत्रण ठेवले जाते. शरीराची नैसर्गिक रित्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जांभळाचा खूपचं उपयोग आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी दिवसातून किमान दोन वेळा तरी जांभळाच सेवन केले पाहिजे. जांभळामध्ये फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असत. हे अँटिऑक्सिडंट शरीराला हानिकारक ठरणारे पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करून, अँटिऑक्सिडंट इंझाएम सुरक्षित ठेवतात. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हल्ली अनेक जणांना मुळव्याधीचा त्रास जाणवतो, अशांनी दररोज ७-८ जांभळे खावीत. काही दिवसांमध्येच तुमचा मुळव्याधाचा त्रास नष्ट होउन जाईल.
धावपळीच्या जीवनामध्ये पचनसंस्थे बाबतीतही असणारे अनेक विकार दूर करण्यासाठी जांभूळ वरदान ठरतं. परंतु, काही लोकांना फळे अनुशा पोटी खायची सवय असते. मात्र, ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. आणि जांभळाचे तर चूकुनही रिकाम्या पोटी सेवन करू नये. आपल्याला असिडीटीचा त्रास जाणवत असेल तर, जांभळाच्या बियाचा वापर केल्यास या समस्येपासून निश्चितच आराम पडू शकेल. जांभूळ पावडर किंवा जांभळाच्या बियांचा अर्क प्यायल्याने सुद्धा गॅसची समस्या दूर होते. दाता संबंधी काही समस्या उद्भवत असतील जसे कि, तुमचे दात आणि हिरड्या हलक्या झाल्या असतील तर जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्याने नक्की आराम मिळू शकतो.
जांभळाचे एक ना अनेक उपयुक्त फायदे आहेत. डायबेटीज बरोबर रक्तदाबाचा त्रास हॉट असेल तर तो कमी करण्यासाठी जांभूळ अथवा त्यांची पावडर नक्कीच फायदेशीर ठरते. जर चेहऱ्यावर तारुण्यपिटीका अथवा मुरुमे आली तर जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावर लेप लावून १५ मिनिटाने धुवून टाकल्यास कालांतराने या त्रासातून मुक्ती मिळण्यास मदत होते. तसेच जांभूळ पावडर, हळद, चंदन पावडर आणि मुलतानी माती यांचे मिश्रण करून याचा लेप चेहऱ्यावर नियमित लावल्यास मुरमे नष्ट होतात व काळपटपणा दूर होऊन चेहरा उजळण्यास मदत होते, अशाप्रकारे सौंदर्य प्रसाधनांमध्येही जांभळाचा वापर केला जातो.