23.8 C
Ratnagiri
Wednesday, December 17, 2025

गुहागर किनारा ‘ब्लू फ्लॅग’च्या अंतिम टप्प्यात…

गुहागर आयोजित किनारी वाळूशिल्प प्रदर्शनावेळी विचारे आणि...

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांची गैरसाय लांजा नगरपंचायतीला निवेदन

सार्वजनिक शौचालयांअभावी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयी संदर्भात भाजपचे...

एलईडी मासेमारी करणाऱ्या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी...
HomeChiplunचिपळूण येथे जन आक्रोश समितीचे तिरडी आंदोलन

चिपळूण येथे जन आक्रोश समितीचे तिरडी आंदोलन

दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडून नवनविन डेडलाईन देण्यात येते.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप गेल्या १२ वर्षात पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या कामाच्या काळात अनेकांचा बळी गेला आहे. सरकार आणि ठेकेदारांने दरवर्षी कामाची नवनविन डेडलाईन दिली परंतु दिलेल्या मुदतीत महामार्गाचे काम होत नसल्याने संतप्त झालेल्या जन आक्रोश समितीने चिपळूणमध्ये शनिवारी तिरडी आंदोलन केले. चिपळूण बहादूरशेख नाका येथे मुंबई गोवा महामार्गावर जनआक्रोश समितीने महामार्ग ठेकेदारांच्या निष्क्रियतेचा निषेध करत प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून सरकारचे लक्ष वेधले. गेल्या १२ वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र अद्याप ते पुर्णत्वास गेलेले नाही.

दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारकडून नवनविन डेडलाईन देण्यात येते. चिपळूणातील उड्डाणपुलाचे काम गेल्या चार वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडून संथ गतीने कामे सुरू असल्याने दरवर्षी नविन डेडलाईनची घोषणा केली जाते. उड्डाणपुल वगळता चिपळूण, खेड हद्दीतील महामार्गाची कामे मार्गी लागली आहेत. परशुराम अजून सुरूच आहे. पावसाळ्यात येथे अपघाताची मालिका सुरु होती. तर संगमेश्वर हद्दीतील कामांना अद्यापही दोन वर्षाचा कालावधी अपेक्षीत आहे. वर्षानुवर्षे ही कामे सुरू असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

जन आक्रोश समिती देखील मुंबई – गोवा महामार्गासाठी सातत्याने आंदोलने करीत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जन आकोश समितीच्या वतीने थेट तिरडी आंदोलन केले. बहादूरशेखनाका येथून मार्कंडी, चिंचनाका, एस. टी. स्टॅन्ड ते पोलिस स्थानक दरम्यान सरकार व ठेकेदाराच्या विरोधात संताप व्यक्त करीत प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांना शासन आणि ठेकेदाराच्या विरोधात तिव्र घोषणाबाजी केली. वेगाने कामे करून महामार्गाचे काम पुर्णत्वास न्या, निष्पाप लोकांचे जिव वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. या तिरडी आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधले. मात्र समि तीचे मोजके पदाधिकारी यात सहभागी झाल्याने त्याची तिव्रता जाणवली नाही. यामध्ये मोठा लोकसहभाग हवा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तिरडी आंदोलनात समितीचे कार्याध्यक्ष सुरेंद्र पवार, उपाध्यक्ष संतोष आंब्रे, खजिनदार संजय जंगम, नियोजन प्रम ख जितेंद्र गिजे, महिला आघाडी प्रमुख विशाखा खेडेकर, चिपळूण शहर प्रमुख महेश टाकले, अँड. स्मिता क़दम, परशुराम आंब्रे, उमेश खैर, निलेश लांजेकर, राजेंद्र माने, मंगेश गोवेकर आदी सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular