24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraपंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीमध्ये घुसली कार, सहा ठार

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीमध्ये घुसली कार, सहा ठार

या भीषण अपघातात दिंडीतील सहा भाविक जागीच गतप्राण झाले आहेत.

जठारवाडी ता. करवीर, जि. कोल्हापूर येथून ३६ भाविक कार्तिकी वारीसाठी श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने दिंडी घेऊन चालले होते. वारकरी दिंडीमार्गे सोमवारी सांगोला तालुक्यात दाखल झाले होते. जुनोनी ता. सांगोला येथे दिंडी रत्नागिरी-सोलापूर महामार्गावरून जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास सांगलीहून सांगोल्याच्या दिशेने येत असणारी मोटार एमएच १३/ डीई ७९३८ हि थेट दिंडीत घुसली. या भीषण अपघातात दिंडीतील सहा भाविक जागीच गतप्राण झाले आहेत.

या भीषण अपघातात दिंडीतील सहा भाविक जागीच ठार झाले; तर जखमी असणाऱ्या शांताबाई सुभाष जाधव वय ७० यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातात अनिता गोपीनाथ जगदाळे वय ६०, अनिता सरदार जाधव वय ५५, सरिता अरुण शियेकर वय ४५, शियेकर वय ३५, सुभाष केशव काटे वय ६७ पाच भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते; परंतु यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

परंतु, अपघाताची घटना घडल्यानंतर वैद्यकीय अधिकारी फुले तब्बल एका तासानंतर दवाखान्यात हजार झाले. यामुळे सांगोला येथील राजकीय पदाधिकारी व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्यात वाद उफाळला. जठारवाडी ता. करवीर, जि. कोल्हापूर येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत मोटार घुसल्याने दिंडीतील सहा वारकरी ठार तर काही जखमी झाले आहेत. काही जखमी वारकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular