26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeSportsमोठ्या स्पर्धांचे तगडे आव्हान, नीरज चोप्राचा नवा विक्रम

मोठ्या स्पर्धांचे तगडे आव्हान, नीरज चोप्राचा नवा विक्रम

आता मी याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यात राष्ट्रकुल स्पर्धांचा देखील समावेश आहे.

नीरज चोप्रा, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूने पावो नुरमी गेम्समध्ये नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. विशेष म्हणजे ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मैदानावर उतरणाऱ्या नीरजने ८९.३० मीटर भालाफेक केली. त्याने फिनलँडमधील या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. फिनलँडच्याच ओलिव्हर हेलेंडरने ८९.८३ मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावले.

नीरज चोप्राने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला ‘टोकियो ऑलिम्पिकनंतर ही माझी पहिलीच स्पर्धा होती. मी या स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मी नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला याच बरोबर रौप्य पदक देखील पटकावले. आता मी याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यात राष्ट्रकुल स्पर्धांचा देखील समावेश आहे. तेथे मला तगडे आव्हान मिळणार आहे.’

नीरज चोप्राचे यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम हा ८८.०७ मीटर भालाफेक करण्याचा होता. हा राष्ट्रीय विक्रम त्याने पटियालामध्ये गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात प्रस्थापित केला होता. यानंतर काही महिन्यांपूर्वी ७ ऑगस्ट २०२१ मध्ये टोकियोत ८७.५८ मीटर भालाफेक करत ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर आता पावो नुरमी गेम्समध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात निरजने ८६.९२ मीटर लांब भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मीटर भाला फेकून आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला. २४ वर्षाच्या निरजचे पुढचे तीनही प्रयत्न फाऊल ठरले. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात नीरजने ८५.८५ मीटर भाला फेकला. नीरज म्हणाला की या स्पर्धेमुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. मी या स्पर्धेत चांगली सुरूवात केली असून, मी अजून चांगली कामगिरी करू शकतो असे वाटते. आता या स्पर्धेत ज्या काही उणिवा राहिल्या आहेत, त्यामध्ये या स्पर्धेतील शिकवण घेऊन त्यात सुधारणा करणार आहे. आता याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धांचे आव्हान स्वीकारायचे आहे.

RELATED ARTICLES

Most Popular