कोकणात मुसळधार पाऊ पडत असत्याने त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन समझाते आहे. कोकण देवेमार्गावर गस्तीसाठी ८७२ नगांची नियुक्ती, अतिमुसळधार पावसात ताशी ४० किमी वेगाने रेल्वे चालवणे यासह आपत्कालीन आव्हानांना तोड देण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा भौगोलिक सुरक्षा आणि ऑपरेशनल तयारीत लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मान्सूनचे वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत महत्त्वाच्या भूसुरक्षा प्रकल्प राबवल्यामुळे माती घसरण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज आणि पायाभूत सुविधांची देखभाल सुरू केली आहे.
रेल्वेमार्गावरील कटिंग्जची तपासणी केली आहे. पावसाळ्यात रेल्वेमार्गावर गस्त घालण्यासाठी ६७२ जवान नेमले आहेत. असुरक्षित ठिकाणी २४ तास गस्त घालण्यात आली असून तिथे वेगावरील निर्बंध घातले आहेत. रेल्वे मेन्टेनन्स व्हीईकल ९ ठिकाणी ठेवण्यात आली असून, आपत्कालीन प्रतिसादासाठी टॉवर वॅगन्स सज्ज आहेत. अतिवृष्टीवेळी रेल्वेचा वेग ४० किमी ताशी ठेवण्याच्या सूचना लोको पायलटला दिल्या आहेत. रत्नागिरी आणि वेर्णा येथे ऑपरेशन थिएटर आणि आपत्कालीन वैद्यकीय साधनांनी सुसज्ज स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन ठेवली आहे. ट्रॅकवर पाण्याची पातळी १०० मिमीपेक्षा जास्त असल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पाणी कमी होईपर्यंत रेल्वेसेवा तात्पुरती स्थगित ठेवण्यात येईल.
लोको पायलट आणि रक्षकांना वॉकीटॉकी सेट देण्यात आले आहेत. सर्व स्टेशन्स २५ वॅट व्हीएचएफ यंत्रणेने जोडण्यात आली आहेत. इमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी मार्गावर अंदाजे प्रत्येक १ किमी अंतरावर सॉकेट्स ठेवली आहेत. पावसाच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ स्थानकांवर स्वयरेकॉर्डिंग पर्जन्यमापक उभारलेले आहे. पावसाळ्यात सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वे आपल्या प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयी सुनिश्चित करण्यासाठी पूर्ण तयारीसह कटिबद्ध असल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी सांगितले.