28.5 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriबेपत्ता जहाजासंबंधी, संशयित जहाजाच्या कॅप्टन आणि क्रू मेम्बर्स गुन्हा दाखल

बेपत्ता जहाजासंबंधी, संशयित जहाजाच्या कॅप्टन आणि क्रू मेम्बर्स गुन्हा दाखल

जयगड बंदरातून नासीर हुसैनमिया संसारे यांची २६ ऑक्टोबर रोजी नावेद-२ ही बोट मासेमारीला गेलेली असताना अचानक बेपत्ता झाली होती. त्यावरून मोठ्या प्रमाणात वादंग पेटला होता. स्थानिक मच्छीमार, शासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घडून सुद्धा त्यावर काहीच ठोस निर्णय होत नव्हता. नावेद-२ हि बोट आणि त्यावरील खलाशांचा सुद्धा काहीच शोध लागत नव्हता. त्यानंतर पाच दिवसांनी या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह किनाऱ्यावर आढळून आला होता.

या बोटीचा शोध घेण्याचे प्रयत्न सर्वच स्तरातून चालू होते. या बोटीवरील खलाशी अद्याप परतलेले नाहीत त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जयगड येथून साधारणपणे ४० दिवसांपूर्वी समुद्रात बेपत्ता झालेल्या नावेद-२ बोटीचे अवशेष मिळाले. सुमारे  दीड महिन्यानंतर ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जयगड येथील समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या पडवे येथील नौकेवरील खलाशांना समुद्रात बोटीचे अँकर,  दोरी व छोटी जाळी असे सापडून आले.

जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद- २ नौकेचे अवशेष शोधण्यासाठी मालकासह स्थानिक मच्छीमारांनी स्कूबा डायर्व्हसची मदत घेतली. त्यात समुद्रात तळात एक मच्छीमारी नौका रुतल्याचे आढळून आले आहे. समुद्रात दोन नॉटीकल मैल अंतरावर नांगर सापडलेल्या ठिकाणी अकरा मीटर खोलीवर ती नौका दिसल्याचा दावा मच्छीमारांनी केला आहे. त्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी नावेदचे मालक श्री. संसारे यांना मदत केली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ही मोहीम सुरु होती. समुद्राच्या तळात एक नौका अडकून असल्याचे स्कुबा डायर्व्हसना आढळल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली. स्कुबा डायव्हर्स्कडून मिळालेली माहिती मच्छीमारांनी पोलिसांना दिली आहे. मात्र हे अवशेष नेमके कोणत्या नौकांचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इतके दिवस गेले तरी सुद्धा बेपत्ता बोटीचा शोध लागला नसल्याने, कोणत्यातरी मालवाहू मोठ्या जहाजाने धडक दिल्याने नावेद-२ बोटीला जलसमाधी मिळाली असे बोलण्यात येत होते. त्यामुळे जयगड पोलीस जिंदालला दगडी कोळसा वाहतूक करणाऱ्या फतेहगड या जहाजावर लक्ष ठेवून होतेत. या जहाजाचा कॅप्टन आणि क्रू मेम्बर्स यांच्याकडून मिळालेल्या माहितीमध्ये फारकत आढळल्याने, त्यांच्यावर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular