22.2 C
Ratnagiri
Monday, January 26, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKokanमच्छिमाऱ्यापुढे आग्या मासळीचे संकट, मासेमारी पुन्हा ठप्प

मच्छिमाऱ्यापुढे आग्या मासळीचे संकट, मासेमारी पुन्हा ठप्प

पावसाळा संपल्यानंतर मासेमारीच्या हंगामाला पुन्हा सुरुवात होते. १ ऑगस्टपासून मासेमारीस सुरुवात झाली असली तरी अतिवृष्टी, वादळी वारे आणि अवकाळी पाऊस अशा अनेक अडचणीमुळे मासेमारी सतत बंद होत होती. त्यामुळे या वर्षभरामध्ये मच्छिमारांना मोठ्याप्रमाणात मासेमारी अशी करण्यास संधीच मिळालेली नाही. महाराष्ट्र शासनाकडे करोडो रुपयांचा डिझेल परतावा प्रलंबित आहे. डिझेलचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये मच्छिमारांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मंडणगड, बाणकोट, बागमांडला तसेच मुरुड तालुक्यातील ५०० नौकांची मासेमारी ठप्प झाली आहे. दसऱ्यानंतर अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे समद्र किनाऱ्यावर अत्यंत दाहक असणारी जेलीफिश आढळू लागली. त्यामुळे मासेमारी हंगामामध्ये मुरूड तालुक्यातील राजपुरीनांदगाव, मुरूड, एकदरा, मजगाव तर श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, कुडगाव, आदगाव, हरवीत  म्हसळा तालुक्यातील वाशी हवेली, तुरंबाडी आदी बंदरातून मासेमारीस जाणार्‍या सुमारे ५०० नौकांची मासेमारी ठप्प झाल्याची माहिती मिळाली.

मच्छिमार मासेमारीसाठी गेले असता, जर १ टन मासळी मिळत असेल तर, २-३ टन आग्या मासळी मिळत आहे. जेलिफिश जाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असून या जेलिफिशचा स्पर्श झाल्यास १५ ते २० तास त्या भागाला खाज सुटत राहते. चुकून डोळ्यांना स्पर्श झाल्यास डोळे लाल आणि मोठा दाह निर्माण होत आहे. या कारणाने समुद्रातील मिळणारी अन्य मासळी जेलीफिशपासून दूर खोल समुद्रात निघून जाते. जे मच्छीमार मासेमारीसाठी गेले होते ते सर्वच बहुधा किनार्‍याकडे परतले आहेत.

जेलिफिशचे आक्रमण जाळ्यासाठी धोकादायक असून, त्यांचा मुक्काम अजून किती दिवस किनार्याजवळ राहील याचा नेम नाही,  अशी माहिती मच्छीमारांनी दिली. कोळी भाषेत जेली फिशला आग्या मासळी असे म्हणतात. परंतु या  मासळीचा खाण्यासाठी कोणी वापर करत नाही. कोळंबी आणि मोठ्या मासळीच्या ऐन हंगामामध्ये जेलिफिशचे मोठ संकट आल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या संकटामुळे ताजी मासळी फारशी दिसून येत नसून, बाहेरगावची मासळी फक्त दिसत आहेत. त्यामुळे मच्छीमार्यानी आई इकविरा आणि श्री देव खंडोबाला गाऱ्हाणे घातले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular