31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...

महावितरणला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून...

४ दिवस रत्नागिरीत पावसाचा इशारा

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी...
HomeRatnagiriअमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महायुतीच्या प्रचार सभेत अमित कदम यांचे असंख्य साथीदार प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव दादर मुंबई येथे दिनांक २१ एप्रिल रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दापोली विधानसभा निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आणि रायगड रत्नागिरी लोकसेभेचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अमित कदम, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असगणीच्या लोकनियुक्त सरपंच सौ संजना बुरटे, संजय बुरटे, युवा नेतृत्व बाळू सनगरे, जयराम चव्हाण आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात पक्षात प्रवेश केला.

अमित तुकाराम कदम हे खेड चे माजी आमदार कै. तु बा कदम यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात कार्यकर्त्यांना संभाळण्या पेक्षा त्यांचे खच्चीकरण कसे होईल या कडे विशेष लक्ष दिले जाते असे यावेळी अमित कदम यांनी आपल्या मनोगतात मांडले. खेडचे माजी आमदार कै. तु. बा. कदम आणि तटकरे यांच्यामधील संबंध पूर्वीपासून दृढ राहिलेले होते. सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अमित कदम आणि त्यांच्या साथीदारांनी पक्ष प्रवेश केला आहे. भरणे येथे होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत अमित कदम यांचे असंख्य साथीदार प्रवेश करणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular