निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी एटीएमसारखे २४ तास उपलब्ध असतो. ते आमचे कर्तव्य आहे. कारण तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे, त्यामुळेच माझ्या जीवात जीव असेपर्यंत जनतेचे काम करत राहणार आहे, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा येथील अल्पसंख्याक मेळाव्यात दिला. मी माझे वडील गेल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा रडलो. त्यानंतर श्रीवर्धन आणि परिसरात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी डोळ्याला डोळा लागला नाही. अनिकेत, अदिती आम्ही कसातरी मार्ग काढून पोचलो आणि जे नुकसानीचे दृश्य पाहिले ते बघून माझे अश्रु थांबत नव्हते.
घडलेला प्रसंग सांगताना सुनिल तटकरे यांना एक क्षणभर गहिवरून आले. समाजासम ाजामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु आजही माझा अल्पसंख्याक सम ाज माझ्यासोबत आहे. कारण या समाजासोबत म ाझे अनेक वर्षाचे ऋणानुबंध चांगले राहिले आहेत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. १९८०-९० दशकात कोकणाला विकासात्मक न्याय मिळाला नव्हता परंतु बॅरिस्टर अंतुले यांच्यामुळे खरा न्याय कोकणाला मिळाला. दूरदृष्टी ठेवून बॅरिस्टर अंतुले यांनी कोकणासाठी काम केले. त्यांच्यासारखा सेक्युलर नेता मी आजवर पाहिला नाही, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. सेक्यूलर विचार आम्ही कधी सोडले नाही आणि सोडणार नाही असे सांगतानाच आम्ही भाजपात गेलो अशी ओरड विरोधक करत आहे मात्र आम्ही भाजपच्या मंत्रीमंडळात गेलो आहोत.
सत्तेतून जनतेचा विश्वास आणि विकास घेऊन काम करण्यासाठी गेल्याचे सांगून अशा अनेक वेगवेगळ्या आघाड्या देशाच्या राजकारणात तयार झाल्याचे सुनिल तटकरे यांनी उदाहरणासहीत सांगितले. प्रत्येकाच्या राजकीय भूमिका असू शकतात पण जसे कुराणात सांगितले आहे तसे भगवदगीतेतही माणूसकीचा विचार ठेवावा तुझे कर्म तू कर असे सांगितले आहे, याची आठवण सुनिल तटकरे यांनी विरोधकांना करुन दिली. १४० कोटी रुपयांचा निधी युनानी महाविद्यालयाला देत २४ तासात मंजुरी मिळाली आहे. अल्पसंख्याक विभागाला निधी देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले आहे. हे सरकार आल्यावर अल्पसंख्याक सम ाजासाठी अनेक विकासकामांसाठी निधी मंजूर करुन घेतला आहे हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
४८ वर्षे मी काँग्रेसमध्ये काम करत होतो. त्यानंतर आता विकास हाच विचार घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे सांगतानाच सर्व धर्मसमभाव हाच आपला उद्देश असला पाहिजे; असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांनी अल्पसंख्याक समाजाला केले. या जिल्हयात अलिबाग येथे युनानी महाविद्यालय तटकरेसाहेबांनी दिले आहे ते रायगड जिल्हयासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करत आहेत असेही बाबा सिद्दीकी म्हणाले. ४० वर्ष एका विचारधारेसोबत जोडलेला होतात मग आता का विचारधारा बदलली आहे, असा संतप्त सवाल अनंत गीते यांना करतानाच आज त्यांचे नेते भाषण करताना एकाच समाजाला संबोधित करतात आपल्या समाजाला डावळत आहेत, अशी जोरदार टिकाही बाबा सिद्दीकी यांनी केली.
या मेळाव्यात अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांनी आपले विचार म ांडले. श्रीवर्धन मतदारसंघातील म्हसळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्यावतीने मेळावा पार पडला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुश्ताक अंतुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी, अल्पसंख्याक सेलचे निरीक्षक नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, डॉ. मुश्ताक मुकादम, नजीब असवारे आदींसह अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.