27.1 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeEntertainmentकार्तिक आर्यनला एका चाहतीची लग्नासाठी २० कोटीची ऑफर

कार्तिक आर्यनला एका चाहतीची लग्नासाठी २० कोटीची ऑफर

एका चाहतीने तर थेट कमेंट करत कार्तिकला म्हटले की,  माझ्याशी लग्न कर, मी तुला २० कोटी देईन.

सध्या अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूपच सक्रिय राहायला लागला आहे. तो त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित पोस्ट देखील आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता नुकताच त्याने स्वतःचा एका लहान चाहती बरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण खरी गम्मत तर पुढे आहे.

आर्यनचे फॅन फॉलोइंग मोठ्या प्रमाणात आहेत. त्या व्हिडियोवर एका चाहतीने कमेंट करत त्याला चक्क लग्नाची ऑफर दिली आहे. या चाहतीच्या ऑफर ऐकून कार्तिकने देखील मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. कार्तिक आर्यनने त्याच्या एका छोट्या फॅन सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी कार्तिकच्या ‘धमाका’ चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसत आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये कार्तिकने लिहिले, “सर्वात सुंदर अर्जुन पाठक.”

अनेक चाहते त्याच्या या व्हिडिओवर कमेंट करून प्रेम दर्शवत आहेत. तर दुसरीकडे एका चाहतीने तर थेट कमेंट करत कार्तिकला म्हटले की,  माझ्याशी लग्न कर, मी तुला २० कोटी देईन यावर कार्तिकनेही मजेशीर उत्तर दिले, “कधी?”  यासोबतच कार्तिकने हसणारा इमोजीही शेअर केला आहे. या चाहतीची ऑफर आणि कार्तिकचे उत्तर सध्या खूपच चर्चेत आहे.

इंडस्ट्री मध्ये कार्तिकची इमेज चॉकलेट हिरो म्हणूनच आहे, त्यामुळे अनेक तरुणींच्या हृदयात त्याचे वास्तव्य आहे. कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या कार्तिक आर्यन आगामी ‘शहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अल्लू अर्जुनचा तमिळ चित्रपट ‘अला वैकुंठपुरमुलू’चा हिंदी रिमेक हा ‘शहजादा’ चित्रपट आहे. रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’मध्ये कार्तिक शिवाय परेश रावल, मनीषा कोईराला, सचिन खेडकर,  रोहित बोस रॉय आणि अंकुर राठी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाशिवाय कार्तिक लवकरच ‘भूल भुलैया २’,  ‘फ्रेडी’ आणि ‘सत्यनारायण की कथा’मध्ये देखील  दिसणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular