यंदा धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडायला परवानगी दिल्याने, सण कोरोनाचे नियम पाळून पण साधेपणाने साजरे करण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात दसर्याच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली. रत्नागिरी शहरी भागात असेलेल विठ्ठल मंदिर हे प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १५ नोव्हेंबर ला संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशीच्या रथ उत्सवाच्या मिरवणुकीसाठी रथ उत्सवाच्या मार्गावर रस्ता सुस्थितीत होणेबाबत नगराध्यक्ष श्री. बंड्या साळवी यांना पत्र देण्यात आले.
रत्नागिरीतील रस्त्यांची झालेली दुर्दशा लक्षात घेता, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी श्री विठ्ठल मंदिर संस्थेच्या माध्यमातून कार्तिकी एकादशीपूर्वी रथ उत्सवाचा मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी रत्नागिरी नगरपालिकेला दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. सदरच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून कार्तिकी एकादशीच्या रथ उत्सव मार्गाचे डांबरीकरण आणि पॅचवर्कला रत्नागिरी नगर पालिकेकडून सुरूवात करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी विठ्ठल मंदिर संस्थेच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल अशोक मयेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. रत्नागिरीतील रस्त्यांची झालेली चाळण लक्षात घेता, निघणारी रथ उत्सवाच्या मार्गात काहीही अडथळे राहू नयेत यासाठी हि रस्त्यंची डागडुजी उपाययोजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्याप्रसंगी नगराध्यक्ष श्री बंड्या साळवी म्हणाले, रथउत्सवाच्या मिरवणुकीचा मार्ग काही ठिकाणी डांबरीकरण व काही ठिकाणी पॅचवर्क करून दिला जाईल. सदरप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री. अशोक मयेकर, जेष्ठ नगरसेवक श्री. राजन शेटे, श्री. संकेत मयेकर, श्री. मंदार मयेकर आणि निखिल चव्हाण उपस्थित होते.