28.6 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

वाटद एमआयडीसीची वाटचाल समर्थनाच्या दिशेने

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात...

वाशिष्ठी नदीत उडी मारणाऱ्या नवदाम्पत्याचा शोध सुरूच

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा गुरूवारी...

रशिया, जपानला त्सुनामीची धडक प्रशांत महासागरात ८.८ रिश्टर तीव्रतेचा भूकप

रशियाच्या अतिपूर्वेकडील भागाला आज सकाळी साडेआठ वाजता...
HomeKokanमहामार्गावर पेटत्या कारचा थरार, जागरूकतेमुळे जीवितहानी टळली

महामार्गावर पेटत्या कारचा थरार, जागरूकतेमुळे जीवितहानी टळली

आज कोकणात येणार्‍या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

कोकणमध्ये शिमगोत्सावाची सुरुवात झाली असून लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात रेल्वे , खाजगी वाहने घेऊन चाकरमानी दाखल होत आहेत. शिमगा आणि गणपती या उत्सवांना बहुतकरून अनेक चाकरमानी आपल्या मूळ घरी उत्सवासाठी दाखल होतात. सध्या सुरु असलेल्या एसटीच्या संपामुळे अनेक जण आपली स्वत:ची किंवा खाजगी वाहनाद्वारे गावी जाताना दिसत आहेत.

शिमगोत्सव हा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणार्‍या कारने कशेडी घाटात पेट घेतला. या जळत्या कारच्या घटनेने परिसरात आगीचे लोळ उसळले होते. आधीच वातावरणामध्ये उष्मा प्रचंड वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. आणि शिमग्याच्या कालावधीमध्ये सगळीकडे होम आणि होळी पेटवली जात असल्याने अधिकच उष्णतेत वाढ झालेली दिसून येते.

महामार्गावर सुद्धा उष्णतेचा कहर झाल्याने, प्रवासा दरम्यान अक्षरशा होरपळून निघायला होते. कारला आग लागल्याचे लक्षात येताच कार मधील प्रवासी बाहेर पडले. त्यामुळे मोठी जिवीत हानी टाळली. नाही तर अशा प्रसंगी दरवाजे लॉक होणे अशा घटना घडल्याने काहीतरी दुर्घटना होण्याची शक्यता दिसून येते आहे.

चालकाने आग लागल्याचे समजताच त्वरित बाहेर येऊन दूर उभा राहिला. आणि क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. छायाचित्रामध्ये आगीच्या रौद्र रूपानेच कारची काय अवस्था झाली असेल हे लक्षात येते.  भर रस्त्यात कारने पेट घेतल्याने काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. दरम्यान पेटत्या कारचे वृत्त समजताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि कालांतराने त्यानी वाहतुक सुरळीत सुरू केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular