कशेडी घाटातील मुंबई-गोवा महामार्गावरील बोगद्याचे काम पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने काम युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गावरील हा कशेडी घाट अवघड वळणांचा जवळपास १३ किमी इतका लांब आहे. या घाटात आजवर अनेक मोठे अपघात घडले असून, अनेकदा जीवितहानी देखील झाली आहे. त्यामुळे वेळ वाचण्यासाठी या सगळ्याला पर्यायी मार्ग असावा असा विचार कधीपासून सुरू होता. त्यावेळी त्या डोंगरामधून बोगदा तयार केल्यास हे जादाचे अंतर कमी होईल. आणि बाहेरून येणाऱ्या अनेक चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
यामुळे सध्या जो कशेडी घाट पार करायला तब्बल पाऊण तास लागतो ते अंतर आता केवळ सहा ते सात मिनिटांवर येणार आहे. थेट या बोगद्यातून पोलादपूरजवळ बाहेर पडता येईल. कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून येत्या मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक लेन वाहतुकीसाठी खुली होणार आहे.
सद्य:स्थितीत बोगद्याचे जोड रस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम शिल्लक असून, अल्पावधीत हे काम पूर्ण करून मुंबईकर चाकरमान्यांना कशेडी बोगदा या वर्षीच्या उन्हाळ्यात खुला होईल. यामुळे कशेडी घाट अवघ्या ४५ मिनिटांत पार होईल तर रत्नागिरी रायगड जिल्ह्याशी अवघ्या दीड मिनिटांत जोडला जाईल. तब्बल ४४१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रत्नागिरी जिल्ह्यासह चाकरमान्यांना मुंबई अधिक जवळ येणार आहे. त्यामुळे मुंबई ते कोकण टप्प्यातील अंतर निश्चितच कमी होणार असून, गावी लवकर पोहोचणे शक्य होणार आहे.