26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeEntertainmentशानदार शुक्रवारी होणार केबीसीमध्ये यांचे आगमन

शानदार शुक्रवारी होणार केबीसीमध्ये यांचे आगमन

या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन एकदम उत्साहात दिसले. दोघांची एन्ट्री होताना अमिताभ बच्चन हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा देताना दिसत आहेत.

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची उत्सुकता आणि प्रसिद्धी दिवसेदिवस वाढतच चालली आहे. अनेक अभिनेते, खेळाडू, अभिनेत्री या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत असतात. अमिताभ बच्चन यांची कार्यक्रमामध्ये असणारी संवाद करण्याची लकब नक्कीच कोणालाही त्या कार्यक्रमापर्यंत खेचून आणते.

मागील आठवड्यामध्ये दीपिका पादुकोण आणि फराह खानने केबीसीच्या १३ व्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग हे दोघे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कौन बनेगा करोडपती सिझन १३ च्या पुढील फॅन्टास्टिक फ्रायडेमध्ये कोण विशेष पाहुणे सहभागी होणार ते आता समोर आले आहे. यावेळी सुद्धा खूपच खास पाहुणे केबीसी मध्ये हजेरी लावणार आहेत.

सोनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर केबीसीचा नविन प्रोमो शेयर केला आहे. यामध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता खेळाडू नीरज चोप्रा आणि हॉकी खेळाडू पी. आर. श्रीजेश सहभागी झालेले दिसून आले आहेत. तसेच त्याला कॅप्शन आपल्या देशाच नाव मोठं करून केबीसी मध्ये येत आहेत असे देण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक मध्ये गोल्ड मेडल पटकावणारे नीरज चोप्रा आणि हॉकीपटू पी. आर. श्रीजेश यांच्यासोबत या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन एकदम उत्साहात दिसले. दोघांची एन्ट्री होताना अमिताभ बच्चन हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा देताना दिसत आहेत.

नीरज चोप्रा गोल्ड मेडल मिळवल्यानंतर अनेक मुलाखतींमध्ये दिसून आला आहे. मात्र कौन बनेगा करोडपतीमध्ये त्याचं येण खूपच खास ठरणार आहे. या कार्यक्रमामध्ये अमिताभ बच्चन नीरज आणि श्रीजेशला उत्सुकतेने विचारताना दिसले आहेत कि, मी तुमच्या मेडल्सना हात लावू शकतो का?

श्रीजेशने अमिताभ यांना सांगितलं कि, २०२१ ने त्याचे आणि संपूर्ण टीमचे आयुष्यच बदलून टाकले. २०१२ साली ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरल्यावर आम्हाला एका सुद्धा मॅचमध्ये यश मिळविता आले नव्हते. कोणत्याही कार्यक्रमात गेल्यांवर आम्हाला सर्वात मागच्या सीटवर बसवण्यात येत असे. अनेक ठिकाणी आमचा खूप अपमान केला गेला. भारतात परत आल्यानंतर लोक आमच्यावर कुत्सितपणे हसत असत. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावल्यानंतर जीवनच पालटले. आमचं सर्व दुःख,  त्रास,  तो वाईट काळ सर्व काही वाहून गेलं. सोनीवर १७ डिसेंबरला हा एपिसोड प्रक्षेपित होणार असून, प्रोमो पाहून सर्वांनाच या एपिसोडची उत्सुकता लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular