24.9 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriजिल्हा रुग्णालय सुसज्ज ठेवा, रत्नागिरी मनसेची मागणी

जिल्हा रुग्णालय सुसज्ज ठेवा, रत्नागिरी मनसेची मागणी

रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे अश्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.

रत्नागिरी-गेल्या काही दिवसात राज्यभरातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या मृत्यूसत्राच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहर मनसे पदाधिकाऱ्यांतफ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची भेट घेण्यात आली. यावेळी रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा, जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे अश्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेत कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्ती होणे गरजेच असल्याची बाब निदर्शनास आली. राज्यभरात घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती.

रत्नागिरीत होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सर्व सुसज्जता राखावी अशी मागणी मनसेकडून निवेदनाद्वारे करण्यात आले. तसेच मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी पक्षाकडून रुग्णालय प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य असेल असे आश्वस्त केले. यावेळी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपशहर अध्यक्ष गौरव चव्हाण, महिला  उपशहर अध्यक्ष शिल्पाताई कुंभार, मनविसे शहर अध्यक्ष तेजस साळवी, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, विभागअध्यक्ष विजयाताई भाटकर, उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश रसाळ, शाखाध्यक्ष साहिल वीर, अनंत शिंदे, यश डोंगरे आदी महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी हजर होते.

RELATED ARTICLES

Most Popular