केजरीवालांचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला. म्हणजे फुगा फूटण्याचा जो प्रकार आहे तो, दिल्लीमध्ये झालेला आहे. खोटं बोलून बोलून आपण किती काळ बोलू शकतो, शेवटी जनतेला सगळं माहिती असतं आणि जनता योग्य पद्धतीने निर्णय करीत असते. त्याचेच प्रतिबिंब आज तुम्हाला दिल्लीमध्ये बघायला मिळालं, असं सांगत आमच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे विधान मत्स्यः द्योगमंत्री ना. नितेश राणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले. काँग्रेसची खरी योग्यता किती हे आज दिल्लीत स्पष्ट झाले. दिल्लीत राहुल गांधींचे जिथे घर आहे तिथे एकही जागा आली नाही. त्यांची योग्यता ही शून्याची आहे आणि महाराष्ट्रामध्ये हेच झालेलं होतं काँग्रेस पक्ष आणि इकडच्या महाविकास आघाडीला त्यांची योग्यता जनतेने दाखवली, असेही ते म्हणाले. मिरकरवाडा परिसरामध्ये पहिल्या टप्प्यातील ३९ कोटीचा निधी आता आम्हाला खर्च करायचा आहे.
त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे, कुठे कुठे निधी खर्च झाला पाहिजे, कंपाउंड वॉलच काम आम्हाला सुरू करायचं आहे. आम्हाला अतिक्रमण हटवून आम्हाला तिकडचा विकास करायचा होताः आता आम्हाला मोकळी जागा मिळाली आहे, आम्ही तिथे आमचा उपलब्ध असणारा पहिल्या टप्प्याचा जो निधी आहे तो निधी खर्च कुठे कशा पध्दतीने करायचा त्या संदर्भात आम्ही चर्चा केली, असे ना. नितेश राणे म्हणाले. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, व त्यांच्या खात्याने हे अतिक्रमण हटवताना जे सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानले. मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दोन-तीन दिवस संपूर्ण प्रक्रिया उत्तमपणे राबवल्याने त्यांचीही पाठ थोपटल्याचे ना. राणे यांनी सांगितले.