28.7 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...
HomeIndiaकेरळ मधील धक्कादायक पार्टनर स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश, ७ अटकेत

केरळ मधील धक्कादायक पार्टनर स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश, ७ अटकेत

लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराची अदलाबदल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केरळ पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश  केला असून सात जणांना अटक केली आहे. लैंगिक संबंध ठेवण्यासाठी आपल्या जोडीदाराची अदलाबदल करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे या रॅकेटमध्ये एक हजाराहून अधिक जोडप्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

लग्न, लिव्ह इन या सगळ्याला फाटा देत पार्टनर स्वॅपिंग हे नवे आणि तेवढेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या रॅकेटमध्ये अडकलेल्या एका तरुणाच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दाखल केल्यानंतर, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या पतीसह आणखी सात जणांना अटक केली आहे. आणि या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

केरळातील कोट्टायम जिल्ह्यात संबंधित घटना घडली आहे. या प्रकरणी करुकचल पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला ही गृहीणी आहे. तर तिचा पती ‘कपल शेअरींग’ ग्रुपचा सक्रीय मेंबर आहे.

पीडित महिलेनं परपुरुषासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करावे यासाठी फिर्यादीचा पती तिच्यावर सतत जबरदस्ती करून दबाव आणत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने करुकचल पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह ‘कपल शेअरींग’  ग्रुपशी संबंधित असणाऱ्या त्याच्या सात मित्रांना देखील अटक केली आहे.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं कि, कपल शेअरींग ग्रुपमधील अजून २५ जणांवर आम्ही पाळत ठेवून होतो. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी काही आरोपीं गळाला लागण्याची शक्यता आहे. तसेच केरळ राज्यातील तब्बल १००० हून अधिक जोडपे या ‘पार्टनर स्वॅपिंग रॅकेट’मध्ये गुंतले असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच यामध्ये अनेक उच्चभ्रू सोसायटीतील हाय क्लास जोडप्यांचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular