29.5 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraअधिवेशनात पेपरफुटी प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापल

अधिवेशनात पेपरफुटी प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापल

यंदाच्या वर्षीचे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईमध्ये कालपासून सुरु झाले आहे. वर्षभर घडलेल्या आणि गाजलेल्या विविध घटनांमुले यंदाचे अधिवेशन चांगलच गाजणार असल्याचं चित्र दिसत आहे. विरोधी पक्ष भाजपाने देखील सरकारला धारेवर धरण्यासाठी चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. तर, सरकार देखील विरोधकांना प्रत्युत्तर देण्याच्या तयारी असल्याचे झालेल्या सर्व पत्रकार परिषदांमधून दिसून येत आहे.

मागील दोन वर्षा अनेक परीक्षा रद्द करण्यात आलेल्या. त्यामध्ये राज्यातील विविध परीक्षांमधील गोंधळ व पेपरफुटी प्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापल आहे. या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधलेल्या निशाण्याला, आता भाजपाकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मुद्यावर पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

उपाध्ये पुढे बोलताना म्हणाले की, “राज्य सरकराने ज्या ज्या परीक्षा घेतल्या, त्या सर्व परीक्षा अगदी काही कालावधी शिल्लक असताना रद्द करण्यात आल्या, किंवा पुढे ढकलण्यात आल्या. म्हाडा आणि टीईटी पेपरफुटीचं प्रकरण अजून ताजं आहे. नवाब मलिक तरी देखील परीक्षेसाठी पुन्हा एकदा मागील सरकारला दोषी ठरवण्याचा,  देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याचा अट्टहास आणि निव्वळ खोटा प्रयत्न करत आहेत. तसेच, ज्या कंपन्यांना काम देण्यात आलं,  आरोग्य भरतीमध्ये न्यासा कम्युनिकेशनला जे काम दिलं त्याचा अध्यादेश ४ मार्च २०२१ चा होता. यावेळी सत्तेवर कोण होतं? हे नवाब मलिकांना माहिती नाही का?  जे स्वत: ज्या सरकारमधील मंत्री आहेत,  त्याचा त्यांनाच विसर पडलेला असल्याचे दिसते आहे.

नुकत्याच आदल्या रात्री तांत्रिक अडचणीचे कारण देत रद्द करण्यात म्हाडाच्या परीक्षेत ज्यांनी गैरव्यवहार केला,  गैरप्रकार केला,  त्या कंपनीला अध्यादेश २२ एप्रिल २०२१ चा होता.  हा अध्यादेश काढतेवेळी सरकार कुणाचं होतं?  नवाब मलिक आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या.

म्हाडा, आरोग्य भरती परीक्षांबाबत ज्या ज्या कंपन्या नेमल्या, या कंपन्यांचा अध्यादेश याच सरकारच्या कार्यकाळात ज्यामध्ये राष्ट्रवादी देखील सहभागी आहे, याच सरकारच्या काळात काढण्यात आला. काळ्या यादीतील कंपनीला काम देण्यात आलं, हा अट्टहास कोणी केला याचं उत्तर नवाब मलिक तुम्ही दिलं पाहिजे.”  एवढ रोखठोक यावेळी केशव उपाध्ये बोलले.

RELATED ARTICLES

Most Popular