२००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा पुनर्रचीत होणार आहे, असे शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे सांगताच संपूर्ण खेड तालुक्यात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांपासून पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण ठरला आहे.खेड येथील हॉटेल बिसु येथे झालेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात राजकीय संकेत दिला. या सोहळ्यात रामदास कदम यांनी हा महत्त्वपूर्ण तालुक्यातील विविध गावांमधील इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिकाधिक भक्कम होताना दिसली. सभागृहात उपस्थित असलेल्या तालुकाप्रमुख अरुण चव्हाण, सचिन धाडवे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, विविध शाखांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी प्रवेशकर्त्यांचे उत्साहात स्वागत केले. माजी मंत्री कदम यांनी खेड नगर पालिकेतील ऐतिहासिक २१-० विजयाचा उल्लेख करत शिवसैनिकांचे मनोबल वाढवले. खेडवासीयांनी यापूर्वीच दाखवून दिले की त्त्यांचा विश्वास शिवसेनेवर आहे.
आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही भगवा एकहाती फडकवण्याची वेळ आली आहे, असे जोरदार आवाहन त्यांनी केले. कदम म्हणाले, २००९ पासून विभागलेला खेड मतदारसंघ पुन्हा तयार होणार आहे. आणि त्या मतदारसंघातून पुढील आमदार हा शिवसेना नेते रामदास कदम देत्तील तोच असेल, याची मला शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी कदम यांनी गुहागर मतदारसंघाचा मुद्दाही अधोरेखित केला. दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी गेल्या काही वर्षात साडेतीन हजार कोटींची विकास कामे केल्याचे सांगत असताना त्यांनी स्पष्ट केले की विकासापासून मागे राहिलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी ते स्वतः प्रयत्नशील राहणार आहेत. त्यामुळे आता दापोली पाठोपाठ गुहागर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे देखील त्यांनी जाहीर केले.

