22.3 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeRatnagiriखेडच्या बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्कला ९ कोटी निधी मंजूर

खेडच्या बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्कला ९ कोटी निधी मंजूर

कोकणाचे नैसर्गिक सौंदर्य विविध प्रकारची फळ झाडे, समुद्र किनारे, नद्या, धबधबे यांनी आणखीनच खुलून जाते. रत्नागिरीतील प्रत्येक तालुक्यांमध्ये काही ना काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. आणि अशा पर्यटन स्थळांचा विकास झाला तर नक्कीच शासनाच्या महसुलात भार होऊन, स्थानिक नागरिकांना देखील रोजगार प्राप्त होईल.

रत्नागिरी खेड तालुक्याम्ध्ये असणाऱ्या जगबुडी नदीमध्ये अनेक मगरींचा वावर आहे. अनेकवेळा मगरींचे दर्शन स्पष्टपणे झालेले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी खेडमध्ये पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीमध्ये राज्य शासनाने जगबुडी नदीत बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्क तयार करण्यासाठी ९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. आणि याबाबतचा दि. ५ जुलै २०२१ ला याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असल्याची माहिती दिली आहे.

खेडच्या पर्यटनाच्या दृष्टीने माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे जगबुडी नदीच्या किनाऱ्यावर क्रोकोडाईल पार्क प्रकल्प तयार होण्यासाठी बरीच वर्ष झटत होते. खेड शहरामध्ये असणाऱ्या सह्याद्री पर्वत रांगा, किल्ले, नद्या त्यामुळे तालुक्याची एक वेगळीच ओळख आहे. कोकण रेल्वे स्थानकापासून सुद्धा हि पर्यटन स्थळे जवळ असल्याने पर्यटकांच्या नक्कीच सोयीचे ठरेल. कोकणच्या सौंदर्यावर फिदा असणारे पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पर्यटक खेडमार्गे दापोली म्हणजेच मिनी महाबळेश्वरला जातात. जर खेडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने जगबुडी नदीमध्ये बोटिंगची सुविधा, क्रोकोडाईल पार्कसारखे प्रकल्प सुरु केले तर खेडच्या पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल.

जगबुडी नदीचा दर्शनी भाग पर्यटनाच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त आहे. मात्र त्यासाठी नुसते आराखडे तयार करून काही उपयोग होणार नसून, प्रत्यक्ष कृतीमध्ये घडण्याची गरज आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी तेथील असणारी अतिक्रमणे हटविण्याचे आणि अवस्छता दूर करण्याच्या सूचना आम. योगेश कदम यांनी मुख्याधिकारी शिंगटे यांना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular