26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeBhaktiचौथी माळ - खेडशीची महालक्ष्मी

चौथी माळ – खेडशीची महालक्ष्मी

रत्नागिरी तालुक्यातील खेडशी या गावी श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. पूर्वी पुरातन असलेले मंदिर, जीर्णोद्धारानंतर नवीन रूपामध्ये भाविकांसाठी सज्ज झाले आहे. देवीची मूर्तीसुद्धा नवीन स्थापन करण्यात आली आहे.

खेडशी गावामध्ये आत मध्ये गेल्यावर पुलाच्या एका बाजूला हे मंदिर आहे. याच मंदिरामध्ये श्री देव सांब, श्री देवी जुगाई, श्री देवी वरदायिनी आणि श्री देवी भराडीनच्या मुर्ती स्थानापन्न आहेत. या मंदिरातील पुरातन मूर्ती सुद्धा देवस्थान संस्थानाने मंदिराच्या पाठच्या भागामध्ये जतन करून ठेवल्या आहेत. रेल्वेने मुंबईला जाताना सुद्धा या मंदिराचे दर्शन घडते.

घटस्थापनेच्या दिवशी राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात आल्याने, या मंदिरात देखील अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अनेक महिला आई महालक्ष्मीची खणा नारळाने ओटी भरण्यासाठी मंदिरामध्ये सहकुटुंब दर्शनासाठी येतात. या मंदिरामध्ये सुद्धा कोरोना निर्बंधाचे पालन करून, भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजाला आलेल्या महालक्ष्मीच्या अनुभवामुळे त्याने महालक्ष्मीच्या चरणी सुवर्णमुद्रा अर्पण केल्या. त्या सुवर्णमुद्रांचे देवीचे मुखवटे तयार करण्यात आले. शिमगा आणि इतर महत्वाच्या सणाला देवीला हे सोन्याचे मुखवटे चढवले जातात. या देवीच्या मंदिरात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

ठराविक मानकऱ्याची घरे पालखी घेते. ५ दिवस पालखी गावातील मंदिराच्या सहाणेवर स्थानापन्न झालेली असते. त्यावेळी याच गावातीलच परंतु, बाहेरच्या शहरांमध्ये वास्तव्याला असलेले अनेक गावकरी शिमग्याची निमित्ताने ग्रामदैवतेच्या दर्शनाला गावी येतात. त्यामुळे धुलीवंदनापासून शिमग्याला सुरुवात होऊन पाडव्याच्या दिवशी सांगता होऊन देवींची सोन्या आणि चांदीची रूपे उतरवली जातात. प्रत्येक मंदिर आणि देवस्थानाची वेगळी खासियत असते.

RELATED ARTICLES

Most Popular