28.2 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeMaharashtraऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु

ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु

देशातील कोरोनाचे प्रमाण सध्या आटोक्यात आलेले दिसून येत आहे. प्रौढांचे आणि तरुणांचे लसीकरण वेगवान गतीने होताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत तरुण आणि प्रौढांचे लसीकरण सुरु होते. परंतु, WHO ने दिलेल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शासन जागरूक असून, लहान मुलांचे सुद्धा लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर महिन्यापासून आत्ता मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. जगातील पहिली डीनए झायकोव-डी लसीला भारतामध्ये परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना लस उपलब्ध होणार आहे. देशामध्ये १२ वर्षावरील वयोगटातील मुलांची संख्या अंदाजे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे सर्वप्रथम ही लस गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या मुलांना देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये गंभीर आजारांच्या श्रेणीमध्ये नेमक्या कोणकोणत्या रोगांचा समावेश केला जाणार आहे, याबाबत निर्णय घेऊन यादी जाहीर केली जाणार आहे.  त्यामुळे या समवयोगटातील निरोगी मुलांना मात्र लसीकरणासाठी मार्च २०२२ पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

निरोगी प्रकृतीच्या मुलांमध्ये आजार किंवा मृत्यूची शक्यता अगदीच नगण्य असते. गंभीर आजार होण्याची शक्यता १८ ते ४५ वयोगटातील लोकांना इतरांपेक्षा जास्त असते. गंभीर आजार असलेल्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घेता त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस देण्याची DCGI  कडून परवानगी मिळली असून, सरकारच्या कोविड वर्किंग ग्रुप कमिटीचे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी सांगितलं की, सर्वप्रथम १२ ते १७ वयोगटातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना हि लस देण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular