माजी क्रिकेटपटू आणि भाजप खास. गौतम गंभीर यांना ISIS कश्मीरकडून मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, अशी धमकी गौतम गंभीरला मिळाली आहे. गौतम गंभीरला ई-मेलवर हे धमकीचं पत्र मिळाले. त्यानंतर गौतम गंभीर आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत मोठी वाढ कऱण्यात आली आहे.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गौतम गंभीर यांनी राजकारणात प्रवेश केलेला, आपल्या बेधडक वक्तव्यामुळे गौतम गंभीर कायमच चर्चेत असतो. प्रसार माध्यमांमध्ये अथवा सोशल मीडियावर गौतम गंभीर आपलं कोणत्याही बाबतीतील मत बेधडकपणे व्यक्त करत असतात. दहशतवादाविरोधात सुद्धा गौतम गंभीर यांनी आपली परखड मतं जनतेसमोर मांडली आहेत. त्यामुळेच त्यांना हा धमकीचा मेल आल्याचं बोलले जात आहे.
दिल्लीचे भाजप खासदार गौतम गंभीर यांना धमकीचा मेल आल्यानंतर, गंभीर यांनी तात्काळ दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांच्या सुरक्षेमध्ये तात्काळ वाढ करण्यात आली आहे. गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच डी.सी.पी श्वेता चौहान यांनी तात्काळ तपास चक्रे वेगानं फिरवली आहेत.
पुढे सांगताना त्या म्हणाल्या कि, खास. गौतम गंभीर यांना मिळालेल्या धमकी प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता, गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ कऱण्यात आली आहे. त्यांच्या घराबाहेर सुद्धा जादा कुमक वाढवून सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांनी माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेला मेलही शेअर करण्यात आला. यामध्ये करण्यात आलेला मेल ISIS कश्मीरच्या नावाने आहे.