21.9 C
Ratnagiri
Sunday, December 21, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeDapoliआता अनिल परब यांचा दापोलीतील ट्विन रिसॉर्ट तुटणार, सोमय्यांचे ट्वीट

आता अनिल परब यांचा दापोलीतील ट्विन रिसॉर्ट तुटणार, सोमय्यांचे ट्वीट

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी २९ ऑगस्ट रोजी तातडीची बैठक बोलावली असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

किरीट सोमय्या आणि अनिल परब रिसोर्ट प्रकरण चांगलच गाजत असून अखेर ते तोडण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. किरीट सोमय्यांनी नोएडातील ट्वीन टॉवरसाठी जे तंत्रज्ञान वापरून १२ सेंकंदात ते पाडण्यात आलं त्याप्रमाणं अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडावे, अशी सूचना मी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे, अशी माहिती दिली आहे. दापोलीतील अनिल परब रिसॉर्ट पाडण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आणि एजन्सी निश्चित करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली आहे.

नोएडातील ट्विन टॉवर कोर्टाच्या आदेशानं पाडण्यात आला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विन टॉवर पडताच शिवसेनेचे नेते अनिल परब यांना डिवचणारं ट्विट केलं आहे. अनिल परब यांचे दापोली मुरूड येथील साई रिसॉर्ट पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी २९ ऑगस्ट रोजी तातडीची बैठक बोलावली असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.

“नोएडातील ट्विन टॉवर पडला, आता अनिल परब यांचा दापोलीतील ट्विन रिसॉर्ट तुटणार, असं किरीट सोमय्यांनी ट्विट करत अनिल परबांना डिवचलं आहे. त्या ट्वीट सोबत सोमय्यांनी ट्विन टॉवर आणि साई रिसॉर्टचा फोटो ट्विट केला आहे.

सोमय्यांनी मागच्या दौऱ्यात मला अनिल परबांच्या आदेशानुसार पोलिसांनी डवले होते, असा आरोप केला होता. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला, इथेपण माझा घातपात करण्याची योजना होती. मला जीवे मारण्याचा ठाकरे सरकारचा प्लॅन होता, असा आरोप सोमय्यांनी केला. खार पोलीस स्टेशन, वाशिम,पुणे याठिकाणी पोलिसांच्या मदतीने माझा खात्मा करण्याचं काम चालू होते, असा खळबळजनक आरोप सोमय्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी वेळीच शहाणपणा दाखवला. त्यांनी दापोलीतल्या मुरुड येथील त्यांचा बंगला आधीच जमीनदोस्त केला. मात्र अनिल परब गाढव आहे, अशा शब्दांत सोमय्यांनी घणाघाती टीका केली. ठाकरे सरकारमधले अधिकारी विकले जाऊ शकतात. मात्र किरीट सोमय्या, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस विकले जाणार नाहीत, असं पुढे सोमय्या म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular