26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeMaharashtraबेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना, सोमय्यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ

बेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना, सोमय्यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ

किरीट सोमय्या यांनी रविवारी आणखी एक ट्विट करुन शिवसेनेच्या माजी आमदारावर निशाणा साधला आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसोर्ट तोडण्यासाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. १०० गाड्यांचा ताफा घेऊन मुरुड येथील अनिल परब यांचे साई रिसोर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. हे रिसोर्ट अद्याप पाडण्यात न आल्याने २६ मार्च रोजी किरीट सोमय्या चक्क प्रतिकात्मक हातोडा घेऊन दापोलीत दाखल झाले होते. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जाणवत असलेली तेढ लक्षात घेता, पोलिसांनी त्यांना मध्येच अडवून थांबविल्याने त्यांना रिसोर्टपर्यंत पोहोचता आले नाही. रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत किरीट सोमय्या ठाण मांडून बसले होते, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना जिल्ह्याबाहेर नेत मुंबईच्या दिशेने पाठविण्यात आले.

किरीट सोमय्या यांनी ‘बेचेनवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला आहे. एका जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

त्यानंतर लगेच किरीट सोमय्या यांनी रविवारी आणखी एक ट्विट करुन शिवसेनेच्या माजी आमदारावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सूर्यकांत दळवी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. दापोलीची कमाई बेचनेवाला शिवसेना, खरीदनेवाला शिवसेना’ असे म्हणत शिवसेनेचे नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना दापोलीचे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जमीन विकल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी या ट्विटमध्ये केला आहे. त्याचा सातबाराही त्यांनी जोडला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular