27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRajapurमाय राजापूर संस्थेचे पदाधिकारी विशेष मागणीसाठी घेणार पर्यटनमंत्र्यांची भेट

माय राजापूर संस्थेचे पदाधिकारी विशेष मागणीसाठी घेणार पर्यटनमंत्र्यांची भेट

राजापूर शहरात आज या वखारीचे थोडेसेच अवशेष शिल्लक राहिले आहेत.

राजापूर हे शहर अर्जुना नदीच्या काठी वसलेले बंदर म्हणून प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. अनेक घाटावरील बाजारपेठांमधून आणण्यात आलेला माल अणुस्कुरा घाटमार्गाने राजापूर बंदरामध्ये येत असे. तेथून बोटीने तो माल अरबस्त्तानामध्ये आणि भारतातील इतर बंदरामध्ये पाठवला जात असे. इंग्रजांनी या ठिकाणी फॅक्टरी म्हणजेच वखार बांधली. या वखारीत असलेल्या मालाचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी याठिकाणी भरभक्कम किल्लाच उभारला. किल्ल्याप्रमाणे तटबंदी, बुरुज, खंदक बांधून, तोफा नी वखार संरक्षणाच्या दृष्टीने सुसज्ज करण्यात आली होती. राजापूर शहरात आज या वखारीचे थोडेसेच अवशेष शिल्लक राहिले आहेत. वखारीत सध्या पोलिस वसाहत आहे.

त्यामुळे शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या ब्रिटिशकालीन वखारीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शिवप्रेमींकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वखारींची जागा पोलिसांच्या ताब्यात असल्याने वखारीच्या पुनरुज्जीवनामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात मिळावी याकरिता प्रयत्न सुरू असून ‘माय राजापूर’ संस्थेचे पदाधिकारी व शिवप्रेमी मंगळवारी रत्नागिरी दौर्‍यावर येणारे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असून त्यांना याबाबत निवेदन देणार आहेत.

सध्या वखारीची जागा पोलिस खात्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही जागा नगर परिषदेच्या ताब्यात मिळावी याकरिता आमदार, खासदार, पालकमंत्री यांना यापूर्वी निवेदने दिली आहेत. मात्र, अद्यापही जागेचा प्रश्न सुटलेला नाही. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. माय राजापूर संस्थेचे पदाधिकारी व शिवप्रेमी पर्यटन मंत्र्यांची भेट घेणार असून वखारीची जागा नगर परिषदेच्या ताब्यात मिळण्यासाठी निवेदन सादर करण्यात येणार आहे. तशी माहिती माय राजापूर संस्थेचे प्रदीप कोळेकर आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular