27.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeDapoliदापोली पोलीस स्थानकाला अचानक लागलेली आग संशयास्पद – किरीट सोमय्या

दापोली पोलीस स्थानकाला अचानक लागलेली आग संशयास्पद – किरीट सोमय्या

पोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी १७ मे रोजी पत्र लिहिले आहे. त्यांनी वरील लिहिलेल्या पत्रातून आपली चिंता पोलिस निरीक्षक यांच्या समोर मांडली आहे.

दापोली पोलीस ठाण्याला शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास अचानक आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या आगीमध्ये काही कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स जळाल्याची माहिती समोर आली आणि ही बातमी किरीट सोमय्या यांना कळताच त्यांनी या अचानक लागलेल्या आगी बाबत संशय आणि चिंता देखील व्यक्त केली आहे.

दापोली पोलिस स्थानकाला लागलेल्या आगीचा भाजपाचे किरीट सोमय्या यांना दाट संशय येत आहे. याबाबत त्यांनी दापोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक अहिरे यांनी १७ मे रोजी पत्र लिहिले आहे. त्यांनी वरील लिहिलेल्या पत्रातून आपली चिंता पोलिस निरीक्षक यांच्या समोर मांडली आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दापोली पोलीस स्टेशनला आग लागली. या आगीत मी दिलेली तक्रार, अनधिकृत साई रिसॉर्ट आणि अनिल परब/सदानंद कदम या संबंधीचे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलेली कारवाई, पोलिसांसोबत केलेला पत्र व्यवहार सुरक्षित आहे का? या संबंधीचा मी प्रमुख तक्रारदार असल्यामुळे मला याबाबत अधिक चिंता जाणवत आहे असे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

त्या सोबतच या आग प्रकरणाबाबतचे मी दिलेल्या पत्राचे त्वरित उत्तर द्यावे असेही त्यांनी पुढे पोलिस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. जेंव्हा दापोली पोलीस स्टेशनला अचानक पहाटे आग लागली तेंव्हाच प्रथम माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती कि, हि आग नक्की शॉक सर्किट मुळेच लागली कि यामागे काही काळबेर आहे. त्यामुळे या बद्दलची शंका दूर करण्यासाठी मी तेथील पोलीस निरीक्षकांना लेखी पत्र लिहले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular