मुंबईमध्ये जवळपास एक कोटी लोकाचे लसीकरण मुंबई मनपा द्वारे करण्यात येईल अशा आशयाचे ट्विट मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केलं होतं. त्यावर एका स्वप्निल नावाच्या युवकाने हे लसीकरणाचे कॉन्ट्रॅक्ट नक्की कोणाला दिलं असा प्रश्न विचारला असता त्यावर “तुझ्या बापाला..” असा प्रतिसाद महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या ट्विटर अकाउंटद्वारे करण्यात आला.
महापौर यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले, बुधवारी दिनांक दोन जून रोजी बीकेसी मध्ये एक कार्यक्रम होता आणि त्यात शिवसेना शाखाप्रमुख आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते जेव्हा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा मोबाईल मी माझ्याजवळ ठेवत नाही तो जवळील कार्यकर्त्या जवळ दिलेला असतो. माझा मोबाईल हा कधीही लॉक असत नाही, त्यामुळे माझ्या नकळत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याने माझा मोबाईल वापरला. त्यात ट्विटर एप्लीकेशन वर जाऊन मी केलेल्या सकाळच्या ट्विट वर त्याने असा आक्षेपार्ह असा रिप्लाय दिला रागाच्या भरात मध्ये त्याने अशाप्रकारे उत्तर दिले असल्याचे त्याने कबूल केले आणि अशा प्रकारचे वक्तव्य किंवा प्रतिसाद हा योग्य नसल्यामुळे मी ते ट्विट डिलीट देखील केले आहे आणि सध्याला त्या कार्यकर्त्याला सुंनावून त्याची हकालपट्टी देखील केली आहे.
या प्रकरणात मी देखील एका प्रकारचा धडा घेतला आहे की स्वतःचा वैयक्तिक मोबाईल कोणत्याही कार्यकर्त्याला देणे नाही कारण आजचे ट्विट हे चुकीचेच होते, पण जर त्यांनी याव्यतिरिक्त आणखीन काही वाईट रित्या नवीन ट्विट केले असते किंवा कोणाला अशा प्रकारात रिप्लाय दिला असता तर त्याने माझी आणि शिवसेनेची बदनामी झाली असती त्यामुळे यापुढे माझा मोबाईल मी कोणालाही देणार नाही हे मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी स्पष्ट केले.