26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanकोकणातील दोन जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना नोटीस

कोकणातील दोन जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना नोटीस

वैध मापन शास्त्र विभागाच्या नियमानुसार २५ मिली पेक्षा कमी पेट्रोल आढळल्यास कारवाई केली जाते.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पाच पेट्रोल पंपांच्या तपासणीमध्ये मापात गडबड केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक नियंत्रक वैध मापन शास्त्र विभागाने प्रत्येक पाच लिटरमध्ये २५ मिलि कमी पेट्रोल भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पंप चालकांना त्यामध्ये सुधारणा करून आपला परवाना नूतनीकरण करण्याच्या सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. या विभागाच्या मुख्यालयातील पथकाने केलेल्या तपासणीत हे पुढे आले आहे कि, अशा प्रकारे कधीही अचानक तपासणी होण्याची शक्यता असल्याने पेट्रोल पंपधारकांमध्ये या पथकाची चांगलीच भीती निर्माण झाली आहे.

शासनाच्या सहाय्यक नियंत्रण वैध मापनशास्त्र विभागामार्फत व्यापारात असणारे वजन काट्यांचे तराजू, इलेक्ट्रॉनिक काटे, मापन आदीचे वर्षाला नुतनीकरण करून घेतले जाते. या उपकरणांची या विभागाकडून तपासणी होते. शासनाने त्या उपकरणाच्या आधारावर शुल्क आकारले आहे. ते शुल्क भरल्यानंतर त्याचे नुतनीकरण केले जाते. त्यामध्ये पेट्रोल पंपाचाही समावेश आहे. पेट्रोल पंपातील फ्युएल नोजलचा म्हणजेच पेट्रोल भरण्याचे उपकरणासाठी देखील परवाना काढलेला असतो आणि तो प्रत्येक वर्षाला नुतणीकरण करण्यासाठी ५ हजार रुपये इतके शुल्क भरावे लागते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये वैध मापन शास्त्र विभागाच्या मुख्यालयातील पथकाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची तपासणी केली असता, त्यामध्ये तळेरे, झाराप,  वेंगुर्ले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्रोल पंपांची तपासणी केली. काही फ्युएल नोजलमधुन ५ लिटर पेट्रोल घेण्यात आले. त्यामध्ये वरील पाच पंपांमध्ये पेट्रोलमध्ये काही मिली कमी प्रमाण आढळून आले.

वैध मापन शास्त्र विभागाच्या नियमानुसार २५ मिली पेक्षा कमी पेट्रोल आढळल्यास कारवाई केली जाते. त्यानुसार वरील दोन्ही जिल्ह्यातील ५ पेट्रोल पंपांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करून फ्युल नोजलचे तत्काळ नूतनीकरण करून घेण्याचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular