30.3 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriउपमुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

उपमुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकणच्या दौर्यावर आले असताना प्रथम सिंधुदुर्गामध्ये आले. त्यावेळी सोबत गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष जोरदार टोला लगावला आहे. शिवराम भाऊ,  डी.बी.ढोलम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते, त्यामुळे विकास कामासाठी निदान राजकारण दूर ठेवाव असं पवार म्हणाले.

“ज्यांच्या नेतृत्वाखालील बॅकेत सतीश सावंत काम करत होते. ते काय काय काम सांगत होते ते  जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते,  पण बंद करायला अक्कल लागत नाही,” असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंना टोला लगावला. आमदार, खासदार होणे सोपी गोष्ट आहे, पण बँकेची निवडणूक लढवणे अवघड गोष्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यामध्ये अग्रेसर असून, येथे स्पर्धा मोठी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. दादागिरी दहशतीला घाबरू नका,” असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे सडाडून टीका केली. तसेच बँकेत चुकीचे वागून चालणार नाही, कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. मात्र निवडणुकीमध्ये कोणीही गाफिल राहण्याची चूक करू नका असं आवाहनही पवार यांनी केलं. यावेळी योग्य व्यक्तीच्या हातामध्ये बँक द्या, अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असंही त्यांनी ठणकावून सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular