27.7 C
Ratnagiri
Monday, January 13, 2025

अवैध मच्छीमारी खपवून घेतली जाणार नाही – ना. नितेश राणे

रत्नागिरी किनारपट्टीवर गत दोन दिवस झालेल्या कार्यवाहीची...

शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वबळावर लढणार...

पर्यटनाला चालना देण्यासाठी एकत्र या – शेखर निकम

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, टिकलेश्वर, प्नचितगड, महिपतगड, भवानगडसारखे...
HomeKokanयंदाच्या गणेशोत्सवात दीड लाखांहून अधिक चाकरमानी होणार कोकणात दाखल

यंदाच्या गणेशोत्सवात दीड लाखांहून अधिक चाकरमानी होणार कोकणात दाखल

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमान्यांना दोन वर्षात गावाकडे येता आले नव्हते.

गणेशोत्सवानिमित्त यंदा कोकणात जाणाऱ्यांची संख्या मागच्या कोरोनाच्या दोन वर्षाच्या तुलनेत अधिक असून सुमारे दीड लाखांहून अधिक जण कोकणात रवाना होणार असल्याची माहीती एसटी महामंडळाने दिली. एसटी गाड्यांची मागणी यावेळी वाढली आहे. रविवारी १२४१ हून अधिक गाड्या कोकणासाठी सोडण्यात आल्या असून, सर्व गाड्या प्रवाशांनी तुफान भरलेल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती विशेष जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९५१ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २,५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. २७ ऑगस्टला १७८ गाड्या रवाना झाल्या. तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ आणि २९ ऑगस्टला १ हजार ४४५ एसटी कोकणसाठी रवाना होतील. कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमान्यांना दोन वर्षात गावाकडे येता आले नव्हते. अनेकांनी गावातील नातेवाईकांच्या मदतीने बंद घरे उघडून तिथे प्रथा सुरु ठेवल्या होत्या. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव घटल्यामुळे यंदा चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ३१ ऑगस्टला गणेश आगमन होणार असून सोमवारपासून मुंबईतून अनेक चाकरमानी गावाकडे येण्यास सुरुवात होईल. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, राज्यात कोविड पूर्ण संपुष्ट आला नसून अजूनही काही ठिकाणी संक्रमित रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हात येणार्‍या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी महामार्गावर, प्रमुख रेल्वे स्थानकांवर तपासणी पथके नेमण्यात आली आहेत. २१ ठिकाणी ही पथके ठेवण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तेथे औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular