27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriचाकरमान्यांच्या मदतीला एस.टी.महामंडळ, २२०० जादा बस सोडणार

चाकरमान्यांच्या मदतीला एस.टी.महामंडळ, २२०० जादा बस सोडणार

गणेशोत्सवासाठी यावर्षी कोकणामध्ये जाण्याचा चाकरमान्यांनी चंगच बांधला आहे. मागील वर्षी कोरोनाच्या भयावह स्थितीमुळे गावी जाता न आल्याने अनेक जणांची नाराजी होती. त्यामुळे यावर्षी कितीही अडचणी आल्या तरी आपल्या बाप्पाला भेटायला गावी जायचेच. प्रवासासाठी येणाऱ्या अडचणी सुद्धा बाप्पाने दूर केल्या आहेत. रत्नागिरीचे पालकमंत्री, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाने कोकणात गणपतीला जाण्यासाठी २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने गेल्यावर्षीचा कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता वाहतुकीवर निर्बंध लादले होतेत. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने चाकरमानी आनंदी झाले आहेत. गणेशोत्सवा दरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असणार आहेत. तसेच वाहनदुरुस्तीसाठी महामार्गावर अनेक ठिकाणी पथक देखील उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहेत, असेही ॲड. परब यांनी सांगितले.

दरवर्षी लालपरी कोकणात गणपती उत्‍सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मदतीसाठी धावत असते. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि.४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट गावापर्यंत विनासायास सोडण्यात येणार आहे. आरक्षणाला सुरुवात दि.१६ जुलै २०२१ पासून होणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी या गाड्या दि.१४ सप्टेंबरपासून जाणार आहेत, परतीच्या प्रवासाचे आरक्षण देखील चाकरमान्यांना एकाचवेळी करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच, मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular