25.8 C
Ratnagiri
Wednesday, February 11, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeKokanपावसातील कोकण आणि घाट रस्त्यांवरील जोखमीची वाहतूक

पावसातील कोकण आणि घाट रस्त्यांवरील जोखमीची वाहतूक

आता पावसाला नुकतीच सुरुवात झाली असल्याने घाटातील वाहतूक तुर्तास तरी सुरळीत रित्या चालू आहे.

खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाट मागील वर्षी प्रमाणे प्रवासास धोकादायक ठरत असल्याने, तसेच अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याने वाहन चालक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. तब्बल एक महिना कालावधीत हा घाट डागडुजीसाठी आणि संरक्षक भिंत बांधण्यासाठी काही काळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अति वृष्टीमुळे दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र आता पावसाला नुकतीच सुरुवात झाली असल्याने घाटातील वाहतूक तुर्तास तरी सुरळीत रित्या चालू आहे.

चिपळूण शहरात गुरुवारी संध्याकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे. चिपळूण नगरपरिषद प्रशासन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सतर्क आहे. पावसाचा जोर लक्षात घेऊन खेड तालुक्यामधील मौजे खोपी जांभीळवाडी येथील दरडग्रस्त लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये एकूण सात कुटुंबांचा समावेश आहे. एकूण २४ जणांना हलवण्यात आले आहे. त्यामध्ये नऊ लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्व ग्रामस्थांना घराजवळच असणारी जुने राहते घर, तसेच जि. प. शाळा या ठिकाणी गुरुवारी संध्याकाळी सुरक्षेचा उपाय म्हणून वेळीच स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी दिली.

खेड तालुका पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा व खेड तालुक्यापासून २५ किलोमीटर अंतरावर असणारा रघुवीर घाट वाहतुकीसाठी आणि पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला आहे, अशा स्वरूपाचे आदेश जारी केले आहेत.

कोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. याचा मोठा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर झाला आहे. याच मार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्यावर मोठी भेग पडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular